आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्घटना:मुंबईतील लालबाग परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट, दुर्घटनेत 20 जण जखमी; महापौर किशोरी पेडणेकरांची घटनास्थळी धाव

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईच्या लालबाग येथील साराभाई इमारतीतील बंद खोलीत गॅस बाटल्याचा स्फोट झाला.

मुंबईतील लालबाग परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. आज (रविवारी) सकाळी ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 20 जण होरपळून जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना केईएम आणि ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेविषयी माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या.

मुंबईच्या लालबाग येथील साराभाई इमारतीतील बंद खोलीत गॅस बाटल्याचा स्फोट झाला. या भीषण स्फोटामध्ये तब्बल 20 स्थानिक जखमी झाले आहेत. सकाळी 7 वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान ही घटना घडली. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून स्फोट झालेल्या खोलीमधून गॅस लीकेजचा वास येत होता. रविवारी सकाळी वास कुठून येतोय हे पाहण्यासाठी स्थानिक नागरिक शोध घेत गेले होते. तेव्हाच अचानक हा स्फोट झाला. या भयंकर स्फोटात परिसरातील तब्बल 20 जण आगीत होरपळून होरपळले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser