आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण सोडत:216 नगर परिषद, नगर पंचायतींची आरक्षण सोडत 13 जून रोजी

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अनेक महापालिका व नगर परिषदांच्या मुदत संपल्याने सध्या तेथील कारभार प्रशासकाच्या हाती आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नसल्याचा राजकीय पक्षांचा आग्रह असल्याने या निवडणुका लांबल्या. मात्र आता त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्यभरातील २१६ नगर परिषदा, नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षणाची सोडत १३ जून रोजी काढण्यात येणार आहे. यात २०८ नगर परिषदा व ८ नगर पंचायती आहेत. त्यानंतर याबाबत असलेल्या हरकती व सूचना १५ ते २१ जून या कालावधी दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व महिलांसाठीची आरक्षण सोडत असेल. संबंधित जिल्हाधिकारी १० जून रोजी याबाबत नोटीस काढून सूचना देतील. १३ जुन रोजी प्रत्येक जिल्हयात सोडत काढली जाईल. आक्षेपांवर सुनावणीनंतर अंतिम अधिसूचना १ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहेे.

बातम्या आणखी आहेत...