आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांना कोरोना:मुंबईतील अनाथाश्रमात 95 मधून 22 मुले आढळळे कोरोना पॉझिटिव्ह, 4 मुले 12 वर्षांपेक्षा कमी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील सेंट जोसेफ स्कूल आणि अनाथालयात 95 पैकी 22 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. मुंबई महापालिकेने याला दुजोरा दिला आहे. 24 ऑगस्ट रोजी या अनाथाश्रमात शिबिर उभारून कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

25 ऑगस्ट रोजी 22 अहवाल पॉझिटिव्ह आढळले होते. यापैकी 4 मुले 12 वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांना नायर रुग्णालयाच्या बालरोग केंद्रात ठेवण्यात आले आहे. याशिवाय 18 मुलांना रिचर्डसन आणि क्रूड्स कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. यापैकी 12 हे 12-18 वर्षांचे आहेत आणि 6 मुले 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...