आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात सोमवारी कोरोनाग्रस्तांची संख्या 2006 झाली आहे. आज औरंगाबादमध्ये कोरोनाचे आणखी 4 नवे रुग्ण आढळले. यासोबत शहरातील रुग्ण संख्या 24 वर पोहोचली आहे. रविवारी 224 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली, तर 22 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 2006 इतकी झाली असून 217 कोरोनाबाधित रुग्णांना बरे करून घरी पाठवण्यात आले. रविवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई 16, पुणे 3, नवी मुंबई 2 आणि सोलापूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये 13 मृत पुरुष असून 9 महिला आहेत. 22 मृतांमध्ये 6 जण 60 वर्षांवरील आहेत. 15 रुग्ण 40 ते 60 वयाचे तर एक जण 40 वर्षाच्या आतला आहे. 22 पैकी 20 रुग्णांना मधुमेह होता. यातील एकास मलेरिया होता. कोरोनामुळे पुण्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील कोरोना मृत्यूंची संख्या आता 151 वर पोहोचली आहे.
आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 33 लोकांचे रिपोर्ट्स आज 13 एप्रिल रोजी सकाळी निगेटिव्ह आले आहेत. काल 40 लोकांचे निगेटिव्ह रिपोर्ट्स प्राप्त झाले होते व आज 33 असे एकूण 73 लोकांचे रिपोर्ट्स निगटिव्ह आले असून ही नक्कीच दिलासा देणारी बाब आहे. अजून जवळपास 100 लोकांचे रिपोर्ट्स प्रलंबित असल्याचे जिल्हा प्रशासनने कळविले आहे.
‘रुबी’तील मुख्य नर्सला कोरोना, 25 नर्स क्वॉरंटाइन
पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील मुख्य परिचारिकेलाच कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली. आता तिच्यासोबत काम करणाऱ्या सुमारे 25 इतर परिचारिकांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. 50 वर्षे वयाच्या या कोरोना पॉझिटिव्ह परिचारिकेवर रुबी रुग्णालयातच उपचार सुरू करण्यात आले आहेत.
755 तबलिगींची चाचणी
दिल्लीच्या निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मरकजसाठी गेलेल्या तबलिगी जमातच्या 755 व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यातील 37 कोरोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान, सांगलीत एकाच घरातील 26 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 24 व्यक्तींना यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.