आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील जवळपास १३ हजार तर ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्यसेवेशी निगडित १० हजार अशी २३ हजार पदे रिक्त असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शुक्रवारी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यासंदर्भात भाजपच्या संजय सावकारे यांनी प्रश्न विचारला होता. राज्यातील आरोग्य सेवा – सुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबई, पुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. या चर्चेतमध्ये इतर सदस्यांनी सहभाग नाेंदवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.