आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक सुट्ट्या जाहीर:सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा 24 सुट्ट्या; त्यातील 4 शनिवार आणि रविवार आल्यामुळे बुडाल्या

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने २०२३ या वर्षासाठी सार्वजनिक सुट्ट्या शुक्रवारी (२ डिसेंबर) जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आगामी वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण २४ सुट्ट्या मिळाल्या आहेत. मात्र, त्यामधील चार सुट्ट्या शनिवार आणि रविवार आल्यामुळे बुडाल्या आहेत.

प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी, होळी (रंगपंचमी ) ७ मार्च, गुढीपाडवा २२ मार्च, रामनवमी ३० मार्च, महावीर जयंती ४ एप्रिल, गुड फ्रायडे ७ एप्रिल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल, महाराष्ट्र दिन १ मे, बुद्धपौर्णिमा ५ मे, बकरी ईद २८ जून, मोहरम २९ जुलै, स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट, पारसी नववर्ष दिन १६ ऑगस्ट, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर, ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती ऑक्टोबर २, दसरा २४ ऑक्टोबर, दिवाळी लक्ष्मीपूजन १२ नोव्हेंबर, गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर, ख्रिसमस २५ डिसेंबर अशा मिळून २४ सार्वजनिक सुट्ट्या सरकारने जाहीर केल्या आहेत. मात्र, फेब्रुवारी महिन्यातील महाशिवरात्री, त्यानंतर रमजान ईद आणि मोहरम हे सण शनिवारी तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि दिवाळी लक्ष्मीपूजन रविवारी असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या या हक्काच्या चार सुट्ट्या बुडाल्या आहेत. हल्ली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा आहे.

बातम्या आणखी आहेत...