आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:सोमवारी राज्यात 8,968 नवीन रुग्णांची नोंद, तर 10,221 रुग्णांची कोरोनावर मात

मुंंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी राज्यात ठीक होणाऱ्यांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त पाहायला मिळाली. सोमवारी राज्यात 8,968 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 10,221 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासोबतच राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 4 लाख 50 हजार 196 झाला आहे. तसेच, आतापर्यंत राज्यात 15,842 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1,47,018 रुग्णांवर उपचार सुरू असून, 2,87,030 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

5 ऑगस्टपासून मुंबईत सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

लॉकडाउनमध्ये मुंबईकरांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकांनाना 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे दुकाने उघडण्याची वेळ यापूर्वी कमी होती. यासोबतच ऑड इव्हन तत्त्वावर ही दुकाने उघडली जात होती. पण, आता 5 ऑगस्टपासून मुंबईतली सर्व दुकाने खुली राहतील.

खासदार नवनीत कौर राणा यांच्या मुलांसह कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचे सासू-सासरे म्हणजेच बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचे आई-वडिलांन कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच समोर आले होते. यानंतर आता रवी आणि नवनीत राणा यांच्या मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 7 वर्षीय मुलगी आणि 4 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

6 ऑगस्टपासून हिंगोलीत चौदा दिवसांचा लॉकडाऊन

हिंगोली जिल्ह्यात सामुदायीक संसर्ग रोखण्यासाठी (ता. ६) ऑगस्ट पासून चौदा दिवसांचा लॉकडाऊन असणार असून या काळात सर्व दुकाने बंद राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

0