आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 25 लाख रुग्ण, 22 लाख कोरोनामुक्त; सक्रिय रुग्णांचा आकडा 2.15 लाखांवर

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात काेरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता २ लाख १५,२४१ वर पोहोचली आहे. सोमवारी राज्यात २४,६४५ नव्या रुग्णांचे निदान झाले. तसेच ५८ मृत्यूंचीही नोंद झाली. राज्याचा मृत्यूदर २.१३% इतका आहे.

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २५ लाख ४,३२७ झाली आहे. एकूण बळींचा आकडाही ५३,४५७ वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत २२ लाख ३४,३३० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सोमवारी १९,४६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रिकव्हरी रेट घसरून ८९.२२ टक्क्यांवर आला आहे.

औरंगाबाददेत २२ मृत्यू, मराठवाड्यात ४,३२३ नवे रुग्ण
औरंगाबाद | मराठवाड्यात सोमवारी ४,३२३ नवे रुग्ण, ४० जणांचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात साेमवारी काेरोनाचे नवे १४०६ रुग्ण आढळले, तर तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी २० जण जिल्ह्यातील तर दाेघे इतर जिल्ह्यातील आहेत. बाधितांपैकी शहरात १०१९, ग्रामीण भागातील ३८७ रुग्ण आहेत. एकूण रुग्णांची संख्या ६८,७६० झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी ६३६ जणांना सुटी देण्यात आली. सध्या मराठवाड्यात २५ हजार ९१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जालना ५६२, परभणी ३१५, हिंगोली ९१, नांदेड १२९१, लातूर २४६, उस्मानाबाद १७३, बीड २३९ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर औरंगाबाद २०, नांदेडमध्ये १०, जालना, परभणीत प्रत्येकी ३, लातूर, बीडमध्ये २ बाधितांचा मृत्यू झाला.

विदर्भात कोरोनाचे ७८ बळी, ६०२९ नवे रुग्ण
अमरावती | विदर्भात सोमवारी कोरोनामुळे ७८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ६०२९ नवे रुग्ण आढळले. मृतांत पूर्व विदर्भातील ५२ ,तर पश्चिम विदर्भातील २६ जणांचा समावेश आहे. यात सर्वाधिक ४० मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाले.
- नागपूर विभागात सोमवारी ४ हजार २०२, तर अमरावती विभागात १८२७ नवे रुग्ण आढळले. विदर्भातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख २१ हजार १३४ वर पोहोचली, तर मृतांची एकूण संख्या ८१६५ झाली आहे.
- आतापर्यंत ३ लाख ५७,३४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सोमवारी ४४०१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. बुलडाणा जिल्ह्यात ५०६, अकोला ३६७, अमरावती ३६५, यवतमाळ २४७ आणि वाशीम जिल्ह्यात ३४२ नवे रुग्ण आढळले.

आजवर १ कोटी ८४ लाख जणांच्या चाचण्या
राज्यात आजवर १ कोटी ८४ लाख ६२,०३० जणांच्या कोरोना चाचण्या केल्या. १३.५६ टक्के जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १० लाख ६३,०७७ जण होम क्वॉरंटाइन तर ११,०९२ जण संस्थात्मक क्वॉरंटाइन आहेत.

बातम्या आणखी आहेत...