आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पीएमएलएअंतर्गत येस बँक आणि डीएचएफएल फसवणूक प्रकरणात व्यावसायिक संजय छाब्रिया यांची २५२ कोटी रुपयांची तर पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांची १६४ कोटी रुपयांची अशा एकूण ४१५ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या प्रकरणात एकूण जप्ती १,८२७ कोटींवर पोहोचली आहे, अशी माहिती ईडी कार्यालयाकडून देण्यात आली.
अविनाश भोसले यांचे मुंबईतील डुप्लेक्स फ्लॅट, छाब्रिया यांची सांताक्रुझमधील आणि बंगळुरूमधील जमीन तसेच सांताक्रुझमधील तीन कोटींचा फ्लॅट जप्त केला आहे. छाब्रियांवर यापूर्वी सीबीआयकडून कारवाई झाली होती. अविनाश भोसले यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा दावा सीबाआयच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. त्यांची लंडनमधील मालमत्ताही वादात सापडली आहे. सीबीआयने तीन दिवसांपूर्वी भोसलेंविरोधात आरोपपत्र दाखल केले, त्यातून ही माहिती समोर आली आहे. लंडनमधील फाइस ट्रॅक ही आलिशान आणि ऐतिहासिक वारसा असलेली इमारत भोसलेंनी २०१८ मध्ये खरेदी केली होती. या इमारतीचे दोनशे खोल्यांच्या हाॅटेलमध्ये रूपांतर करण्याचा त्यांचा मनोदय होता. बर्मिंगहम पॅलेसजवळ ही मालमत्ता होती. त्यामुळे भारतीय उद्योजकाने ही इमारत खरेदी केल्यानंतर त्याची चर्चाही झाली होती.
भोसलेंची पुन्हा चौकशी होण्याची शक्य
अविनाश भोसले सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची पुन्हा सीबीआय कोठडी घेऊन चौकशी केली जाऊ शकते. त्यांना या प्रकरणात २६ मे रोजी अटक झाली होती. तेव्हापासून ते कोठडीतच आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.