आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हल्ल्याची 13 वर्षे:तीन दिवस मुंबईला रक्तबंबाळ करत होते 10 दहशतवादी; कसा केला त्यांचा खात्मा; 20 फोटोंमध्ये पाहा

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

26 नोव्हेंबर 2008 ची ती रात्र भयानक होती. मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसरात नाकाबंदीचे आदेश पोलिसांच्या पथकाला मिळाले. रात्री 12.30 वाजता त्यांना एक संशयास्पद स्कोडा दिसली. पोलिस त्या दिशेने सरकताच कार दुभाजकावर चढून दुसऱ्या बाजूने जाऊ लागली. त्यानंतर गोळीबार सुरू झाला आणि यामध्ये स्कोडा चालकाचा मृत्यू झाला. हा ड्रायव्हर दहशतवादी इस्माईल खान होता.

कारच्या दुसऱ्या बाजूने कसाब एके-47 घेऊन बाहेर आला. कसाबने ट्रिगर दाबताच सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी त्याच्या बंदुकीची बॅरल पकडली. ओंबळे यांना सहा ते सात गोळ्या लागल्या, मात्र त्यांनी आपली पकड कायम ठेवली. तोपर्यंत पोलिसांचे पथक पोहोचले आणि त्यांनी कसाबवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. तोपर्यंत देशाची आर्थिक राजधानी रक्तबंबाळ झाली होती.

मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्षे पूर्ण होत आहेत. 20 फोटोंमध्ये पाहा, त्या भयानक दिवसाची कहाणी आठवली की आजही जीव थरथर कापतो...

कसाब आणि इतर दहशतवाद्यांना मासेमारी, नकाशे समजून घेणे, जीपीएस आणि कंपास वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. कसाबला वाटले की त्याला मरीनमध्ये सामील होण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे आणि त्यानंतर त्याला प्रामाणिक नोकरी मिळेल. हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांकडे बनावट ओळखपत्रे होती ज्यामुळे ते हैदराबादचे विद्यार्थी दिसतील. भारतीयांना भ्रमित करण्यासाठी हे केले गेले होते.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी यापूर्वी दोनदा प्रयत्न केले होते. एकदा त्याची बोट दगडाला धडकली आणि तो बुडताना वाचले. या हल्ल्यात सामील असलेल्या 10 दहशतवाद्यांची नावे आहेत - अजमल अमीर, अबू इस्माईल डेरा, हाफीज अर्शद, बाबर इम्रान, जावेद, शोएब, नझीर अहमद, नसीर, अब्दुल रहमान, फहदुल्ला आणि अजमल कसाब. यामध्ये 9 दहशतवादी मारले गेले आणि फक्त कसाब जिवंत पकडला गेला.

10 हल्लेखोर कराचीहून बोटीने मुंबईत दाखल झाले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हे हल्लेखोर कुलाब्याजवळील कफ परेडच्या मासळी मार्केटमध्ये उतरले. तिथून ते चार गटात विभागले गेले आणि टॅक्सी घेऊन आपापल्या टार्गेटकडे निघाले.

मुंबईतील ज्यूंचे नरिमन हाऊस हे मुख्य लक्ष्य होते. येथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. भिंतींवरील रक्ताचे ठिपके हे त्याचेच द्योतक आहेत. बचावासाठी आलेले एनएसजी कमांडो चुकीच्या इमारतीत उतरले कारण त्यांना घेऊन आलेल्या हेलिकॉप्टरचा पायलट नरिमन हाऊस ओळखत नव्हता.

रात्री 9.30 च्या सुमारास दोन दहशतवादी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या मुख्य हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दोघांच्या हातात एके 47 रायफल होत्या आणि पंधरा मिनिटांत त्यांनी 58 लोकांना ठार आणि 109 जण जखमी केले.

हल्ल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर सांडलेले रक्त एक सफाई कर्मचारी साफ करताना

हल्ल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर एका वृद्ध व्यक्तीला मदत करताना एक पोलीस.

एक जखमी पत्रकार त्याच्या साथीदारांसह मुंबई हल्ल्याचे कव्हर घेत असताना. लाईव्ह मीडिया कव्हरेजनेही या हल्ल्याची दहशतवाद्यांना मदत केली. कुठे काय चाललंय ते सगळे आत TV वर बघत होते.

27 नोव्हेंबर 2008 रोजी पहाटे मुंबईतील कुलाबा परिसरात एक पोलीस अधिकारी आपली पोझिशन घेतो. ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊसमध्ये दहशतवाद्यांनी अनेकांना कैद केले होते. 60 तासांच्या कारवाईनंतर सुरक्षा दलांनी सर्व दहशतवाद्यांना ठार केले.

हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमध्ये युरोपियन युनियन संसदीय समितीचे आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अनेक सदस्य देखील उपस्थित होते, त्यांच्यापैकी कोणालाही इजा झाली नाही.

ओबेरॉयमध्ये उपस्थित लोकांमध्येही अनेक नामांकित लोक होते. यामध्ये भारतीय खासदार एनएन कृष्णदास यांचाही समावेश होता जे प्रसिद्ध ब्रिटीश उद्योगपती सर गुलाम नून यांच्यासोबत जेवत होते. हे छायाचित्र नरिमन हाऊसमध्ये ऑपरेशनसाठी उतरलेल्या कमांडोंचे आहे.

२६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर मुंबईतील जुहू येथील पंचतारांकित हॉटेल जेडब्ल्यू मॅरियटच्या बाहेर उभे असलेले लष्कराचे जवान. हल्ल्यानंतर मुंबईतील सर्व मोठ्या हॉटेल्सची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

ताज हॉटेलमध्ये ओलिसांना सोडवण्यासाठी ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन दरम्यान, स्निफर डॉगसह कमांडो ताज हॉटेलमधून बाहेर पडताना.

27 नोव्हेंबर 2008 रोजी नरिमन हाऊसच्या बाहेर सीआरपीएफचे जवान गस्त घालताना. हे ठिकाण दहशतवाद्यांचे प्रमुख लक्ष्य होते.

ताज हॉटेलच्या बाहेर आपली पोझिशन घेताना एक भारतीय सैनिक. हे छायाचित्र 27 नोव्हेंबर 2008 चे आहे, जेव्हा दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी ऑपरेशन केले जात होते.

सुमारे 60 तास चाललेले ऑपरेशन संपवून जेव्हा कमांडोज परत येऊ लागले तेव्हा लोकांनी त्यांचे स्वागत केले.

27 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील कुलाबा मार्केट परिसरात लष्कराने ताबा घेतला होता.

दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील ताज हॉटेलबाहेरचे दृश्य. आतून गोळीबार आणि स्फोट होत होते आणि बाहेर गोंधळ उडाला होता.

कसाबला चार वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले. येथे तो मराठी शिकला. त्याच्या प्रत्येक सुनावणीत करदात्यांचे एक लाख रुपये खर्च होत होता. कसाबची सुरक्षा आणि खटला यासाठी सुमारे 43 कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याला 21 नोव्हेंबर 2012 रोजी फाशी देण्यात आली.

मुंबई दहशतवादी हल्ल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर शहीद झाले. कामा हॉस्पिटलबाहेर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

बातम्या आणखी आहेत...