आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकर्सनी पाणीपुरवठा:राज्यातील वाड्यांना 270 टँकर्सनी होतोय पाणीपुरवठा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील पिण्याच्या पाण्याची सद्य:स्थिती आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी आढावा घेण्यात आला. राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची माहिती देण्यात आली. यंदा राज्यातील सर्व प्रकल्पांमधील पाणीसाठा ४१.१९ टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा ३९.९२ टक्के इतके होता. राज्यातील २८१ गावे, ७३८ वाड्यांना २७० टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

सा आहे पाणीसाठी (कंसात गतवर्षीची टक्केवारी) : अमरावती-५०.०८ टक्के (४७.२५). औरंगाबाद-५०.१५ (४२.६०). कोकण-४७.९६ (४७.६२). नागपूर-३७.३९ (४४.२७). नाशिक-४१.०४ ( ४३.५९). पुणे-३४.११ (३२.१२टक्के) आहे. राज्यातील २८१ गावे, ७३८ वाड्यांना २७० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

या आठवड्यामध्ये गावांच्या संख्येमध्ये ६८ ने तर वाड्या-वस्त्यांच्या संख्येमध्ये १७५ ने वाढ झाली आहे. टँकर्सच्या संख्येमध्येही ८३ ने वाढ झाली आहे. ५७ शासकीय व २१३ खासगी अशा एकूण २७० टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...