आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचे चार तुकडे करुन किचनमध्ये पुरले; 6 वर्षीय मुलीने केला घटनेचा उलगडा

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्यानंतर पती-पत्नीत सुरू झाला वाद

मुंबईतील दहिसर परिसरा राहणाऱ्या एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचेचा चार तुकडे करुन स्वयंपाकघरात पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा उळगडा त्यांच्याच 6 वर्षीय मुलीने केला आणि खूनाच्या 11 दिवसानंत पोलिसांनी आरोपींना बेड्या ताब्यात घेतले.

मुंबई पोलिसांतील DCP (झोन 11)विशाल ठाकुर यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील गोंडाचे रहिवासी असलेल्या रईसचे 2012 मध्ये शाहिदा नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघे मुंबईच्या दहिसर पूर्व परिसरातील खान कंपाउंडमध्ये किरायाच्या घरात राहू लागले. त्या दोघांना एक सहा वर्षांची मुलगी आहे. रईस दहिसर परिसरातील एका कपड्याच्या दुकानात काम करायचा.

अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्यानंतर सुरू झाला वाद
पोलिसांनी सांगितल्यानुसार, रईस कामावर गेल्यावर अनिकेत उर्फ अमित मिश्रा नावाच्या व्यक्ती महिलेच्या घरी यायचा. शाहिदाचे अनिकेतसोबत अनैतिक संबंध होते. काही दिवसानंतर या संबंधाची माहिती रईसला लागली आणि त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले. सतत होणाऱ्या या वादामुळे त्रस्त होऊन शाहिदाने अनिकेतसोबत मिळून रईसचा काटा काढला.

चाकू भोसकून केली हत्या

विशाल ठाकुर यांनी पुढे सांगितले की, 20 मे रोजी रईस घराबाहेर गेल्यावर अनिकेत घरी आला. काही वेळानंतर रईस घरी परतल्यावर त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. यावेळी रईस आणि शाहिदामध्ये भांडण सुरू झाले. यादरम्यान शाहिदाने रईसला चाकू भोसकला. यानंतर प्रियकरासोबत मिळून त्याचा गळा कापला आणि शरीराचे चार तुकडे करुन स्वयंपाक घरात पुरलाल. ही सर्व घटना त्यांच्या सहा वर्षीय मुलीने पाहिली.

असा झाला घटनेचा उलगडा
रईस अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्याच्या मित्रांना संशय आला. त्याच्या मित्रांनी दहिसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपाससुरू केला असता सहा वर्षीय मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी स्वयंपाक घराकील मृतदेह बाहेर काढला आणि आरोपींना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...