आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:महागाई भत्त्यात 3% वाढ ऑगस्टच्या वेतनात रोखीने, 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारने आपल्या पहिल्याच अधिवेशनाच्या तोंडावर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही वाढ केंद्र शासनाच्या धर्तीवर असेल, ही वाढीव रक्कम ऑगस्ट २०२२ पासून अर्थात ऑगस्ट महिन्याच्या वेतनात समाविष्ट करुन रोखीने देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता यामुळे ३१ वरून ३४ टक्के होणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.

वैद्यकीय उपकरणे खरेदी : वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर आनुषंगिक खरेदी ही गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस या पोर्टलच्या माध्यमातून करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले.

पथकातील गोविंदाला १० लाखांचे विमा संरक्षण शासनाने विमा कवच द्यावे अशी गोविंदा पथकांची मागणी होती. त्यानुसार गोविंदांना आता १० लाखांचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...