आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद महानगरपालिकेचे सुमारे ३० ते ४० भूखंड खासगी व्यक्तीने बळकावले यात तथ्य नाही. मात्र, जानेवारी २०२१ मध्ये त्रिमूर्ती चौकातील एका भूखंडाच्या मोजणीच्या वेळी आखीव पत्रिकेवरून महानगरपालिकेचे नाव वगळण्याची बाब निदर्शनास आली, ही वस्तुस्थिती असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केले होते.
औरंगाबाद महानगरपालिकेचे सुमारे ३० ते ४० भूखंड खासगी व्यक्तींनी बळकावले असून त्रिमूर्ती चौकातील एका भूखंडाच्या पीआर कार्डवरून महानगरपालिकेचे नाव वगळण्यात आल्याचे जानेवारीमध्ये निदर्शनास आले आहे. महानगरपालिकेतील मालमत्ता विभाग व नगररचना विभागात समन्वयाचा अभाव असल्याने तसेच अनेक भूखंड महानगरपालिकेच्या नावावर नसल्याने खासगी लोकांनी भूखंड बळकावले आहेत. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
त्यावर शिंदे यांनी उत्तर दिले. औरंगाबाद महानगरपालिकेचे सुमारे ३० ते ४० भूखंड खासगी व्यक्तीने बळकावले यात तथ्य नाही. मात्र जानेवारी २०२१ मध्ये त्रिमूर्ती चौकातील एका भूखंडाच्या मोजणीच्या वेळी आखीव पत्रिकेवरून महानगरपालिकेचे नाव वगळण्याची बाब निदर्शनास आली, ही वस्तुस्थिती आहे.
औरंगाबादच्या त्रिमूर्ती चौकातील भूखंड
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील गारखेडा, विनायकनगर, त्रिमूर्ती चौक येथील न.भू.क्र. १५३५ ९ / ३४/२/१ ही मिळकत महानगरपालिकेच्या मालकीची असून मंजूर विकास योजनेमध्ये आरक्षित आहे. नगर भूमापन अधिकाऱ्यांनी १९९५ मध्ये विकास प्राधिकरणाची पूर्वपरवानगी न घेता नवीन मिळकत पत्रिका उघडून त्यास संबंधित खरेदीदाराचे नाव लावले. याबाबत नगर भूमापन कार्यालयाकडून जागेची मोजणी करण्यासाठी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोजणीसाठी प्रत्यक्ष जागेवर महानगरपालिकेचे कर्मचारी पाठवले असता, मोजणी करावयाची मिळकत ही महानगरपालिकेची असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.