आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्री कुस्ती अन् सुमोची:अजिंठा अभ्यागत केंद्रासाठी जपानची 300 कोटींची मदत; महाराष्ट्र- वाकायामा प्रांतात सामंजस्य करार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांत यांच्यात सामंजस्य कराराची दशकपूर्ती अन् नूतनीकरणानिमित्त गेट वे ऑफ इंडियासमोर सुमो लढतीची प्रात्यक्षिके,झगमगीत लेझर शो पार पडला. वाकायामा प्रांताने जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील अभ्यागत केंद्रासाठी वाकायामा शासनाने ३०० कोटी रुपयांचे सहकार्य केले आहे.

महाराष्ट्राप्रमाणेच वाकायामाही कुस्तीप्रेमी महाराष्ट्रात कुस्तीची दीर्घ परंपरा आहे. त्याप्रमाणेच वाकायामा प्रांतातही सुमो कुस्ती लोकप्रिय आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे क्रीडा संचालनालय आणि वाकायामा कुस्ती महासंघ यांच्यात करार झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...