आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:मुंबईमध्ये खासगी रुग्णालयांना 80% बेड कोरोना रुग्णांना रिजर्व्ह ठेवण्याचे निर्देश, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी वार्ड वॉर रूमची मंजूरी आवश्यक

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने मुंबईतील कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीत खासगी रुग्णालयांना एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, वॉर्ड वॉर रूम अलॉटमेंटच्या कोरोना रूग्णांसाठी कोविड बेडपैकी ८०% आणि १००% ICU बेड वार्ड वॉर रूम अलॉटमेंच्या कोरोना रुग्णांसाठी रिजर्व्ह करावे लागतील. रुग्णालयातील कोणत्याही रूग्णाला थेट दाखल करण्यास मनाई आहे. बीएमसी कमिशनर आयएस चहल म्हणाले की कोरोना वार रूमद्वारे सर्व कोरोना रूग्णांना बेडचे वाटप केले जाईल. अशा परिस्थितीत कोणत्याही रुग्णाने कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट थेट लॅबमधून घेण्याचा प्रयत्न करु नये.

दरम्यान राज्यात गेल्या २४ तासांत ३१ हजार ६४३ नवीन रुग्णांची भर पडली. अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता साडेतीन लाखांच्या जवळ गेल्याने चिंता वाढली आहे. राज्यात सोमवारी १०२ रुग्ण दगावले. मृतांचा एकूण आकडा ५४ हजार २८३ झाला.

राज्यात सध्या ३ लाख ३६ हजार ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात सर्वाधिक ५९ हजार ४७५ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. मुंबईत सध्या ४६ हजार २४८ तर नागपूर जिल्ह्यात ४५ हजार ३२२ रुग्ण आहेत.

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात २८४७ नवे रुग्ण, २५ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात सोमवारी (दि. २९) २८४७ काेराेनाचे नवे रुग्ण दाखल करण्यात आले. दिवसभरात २६१० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. धक्कादायक बाब म्हणजे दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २३५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी दिवसभरात नाशिक महानगर पालिका रुग्णालयात १६५८, ग्रामीण रुग्णालयामध्ये ९८१, मालेगाव मनपा रुग्णालयात १७५ आणि जिल्हा बाह्य ३३ रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले. नाशिक महानगर पालिकेच्या रुग्णालयात ५, ग्रामीण रुग्णालयामध्ये १७ आणि मालेगाव मनपा रुग्णालयात ३ रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...