आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:भूविकास बँकेची 348 कोटींची कर्जे माफ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश, 33,895 शेतकऱ्यांना लाभ

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेची सरसकट थकीत शेती कर्जे माफ करण्याचा तसेच कामगारांची देणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांना आणि ३ हजार २९६ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

या संदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीस सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ तसेच बच्चू कडू, विश्वजित कदम हे राज्यमंत्री हजर होते. बैठकीत पवार यांनी सहकार विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. भरपाईच्या माेबदल्यात राज्य सरकार बँकेच्या सर्व मालमत्ता ताब्यात घेणार आहे. बँकेची मालमत्ता ताब्यात घेऊन देणी देता येणार नाहीत का, अशी राज्य बँकेला विचारणा करण्यात आली होती.

१९३५ मध्ये स्थापन झालेली भूविकास बँक २०१६ मध्ये अवसायनात निघाली होती. तेव्हापासून कर्ज आणि कामगार देणी दोन्ही थकलेली आहेत. कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलन करत याप्रकरणी तोडगा काढण्याची विनंती केली होती. या बँकेची शेतकऱ्यांकडे ३४८ कोटीची कर्जे थकीत आहेत, तर कर्मचाऱ्यांची २८३ कोटींची देणी बाकी आहेत. यापूर्वी अनेकदा विधिमंडळात भूविकास बँकेबाबत तोडगा काढण्याची चर्चा झाली. सरकारने आश्वासने दिली, मात्र अद्याप तोडगा निघू शकलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...