आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारची विक्री वाढली:ऑगस्टमध्ये 3.5 लाख कारची खरेदी, ती गेल्या वर्षापेक्षा 30 टक्के जास्त

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

-देशात कारच्या खरेदीने वेग घेतला आहे. ऑगस्टमध्ये होलसेल ३.३५ लाख कार विकल्या गेल्या. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये २.५६ लाख कार विकल्या होत्या. म्हणजे विक्री ३०% वाढली आहे. सर्व ठिकाणचे आकडे आल्यानंतर ही संख्या ३.४० लाखही होऊ शकते.

-ऑगस्ट सलग पाचवा महिना आहे, ज्यात कारची होलसेल विक्री ३ लाखांच्या वर राहिली आहे. -कारखान्यांतून कार डिस्पॅचच्या वाढत्या कलाचा अर्थ असा आहे की, सणासुदीचा हंगाम पाहता वितरकांनी कारचा साठा वाढवला आहे. त्यामुळे प्रतीक्षा काळ घटेल.सध्या कारचे वेटिंग ६.५ लाख ते ७ लाखांदरम्यान आहे.

-सेमीकंडक्टरच्या पुरवठ्याची समस्या आता थोडी कमी झाली आहे. विक्री वाढण्याचे हेही एक मोठे कारण आहे.

पीएमआय ५६.२; म्हणजे उद्योगांत उत्पादन वाढले ऑगस्टमध्ये देशाचा पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ५६.२ राहिला. हा नोव्हेंबर २०२१ नंतरचा दुसरा सर्वोच्च स्तर आहे. पीएमआय ५० च्या वर राहणे हे अर्थव्यवस्थेतील वाढीचा थेट संकेत आहे. त्याचा अर्थ वस्तू उत्पादन व विक्री दोन्हीही वाढत आहे, असा त्याचा अर्थ होतो.

-कच्च्या मालाच्या दरांत ४ महिन्यांपासून सतत घसरण होत आहे. त्यामुळे कारखान्यांनी कच्च्या मालाची बम्पर खरेदी केली आहे. बिझनेस कॉन्फिडन्स गेल्या ६ वर्षांच्या तुलनेत सर्वोच्च स्तरावर आहे. त्यामुळे पुढील २-३ महिने जास्त उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...