आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्तावास मान्यता:महाराष्ट्रात हिंदुजा समूहाची 35 हजार कोटींची गुंतवणूक; मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदुजा समूहाने महाराष्ट्रात विविध ११ क्षेत्रांमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार राज्य शासनासोबत केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून त्याचे आदानप्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले, २ दिवसांपूर्वी शासनाने ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मान्यता दिली. त्यातून ५५ हजारांवर रोजगार मिळेल. नवीकरणीय ऊर्जा, माध्यमे व मनोरंजन, ग्रामीण आर्थिक विकास, सायबर सुरक्षा, व्यावसायिक ऑटोमोबाइल्स, बँकिंग- फायनान्स, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, उत्पादन व नवतंत्रज्ञान या ११ क्षेत्रात हिंदुजा समूह गुंतवणूक करेल.

बातम्या आणखी आहेत...