आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व संतश्रेष्ठ तुकाेबा महाराजांना अभिवादन करून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. यंदा शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. यानिमित्ताने उत्साहात महोत्सव साजरा करण्यासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच आंबेगाव (पुणे) येथील छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावर आधारित उद्याने विकसित करण्याचा संकल्पही बजेटमध्ये मांडण्यात आला. त्यासाठी एकूण २५० कोटींची तरतूद केली आहे. तसेच शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावरील संग्रहालय उभारण्यासाठी तसेच शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धन प्रकल्पासाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली.
यासोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलमधील स्मारक, भिडेवाडा (पुणे) येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक या महापुरुषांच्या स्मारकांसोबतच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठीही निधीची तरतूद केल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. विविध समाजांची श्रद्धास्थाने असलेल्या देवस्थानांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. सर्व जाती- धर्माच्या लोकांना खुश करण्याचा यातून सरकारने प्रयत्न केलेला आहे. तसेच राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही निधी मंजूर केला आहे. यात विशेषकरून रस्ते, रेल्वे व विमानसेवांचे जाळे विस्तारण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
अन्य विभागांसाठी तरतूद गृह विभाग : 2187 कोटी रुपये महसूल विभाग : 434 कोटी रुपये वित्त विभाग : 190 कोटी रुपये सांस्कृतिक कार्य विभाग : 1085 कोटी मराठी भाषा विभाग : 65 कोटी रुपये विधी व न्याय विभाग : 694 कोटी रुपये माहिती तंत्रज्ञान व माहिती जनसंपर्क विभाग : 1342 कोटी रुपये महाराष्ट्र विधान मंडळ : 500 कोटी
पाच विभागांत शिवउद्यानांसाठी २५० कोटी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.