आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख वार्ता:नाशिक, उस्मानाबाद, सोलापूरसह राज्यात 35 हजार 500 कोटींची गुंतवणूक; 1879 हेक्टरचा पवनऊर्जा प्रकल्प, 5 हजार रोजगार

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई व कंपनीचे अधिकारी. - Divya Marathi
करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई व कंपनीचे अधिकारी.

देशातील ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य उद्योग समूह जेएसडब्ल्यू एनर्जी राज्यात सुमारे ३५,५०० कोटींची गुंतवणूक करणार असून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे दीड हजार मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प तर उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ५ हजार मेगावॅट क्षमतेेचे पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

मंगळवारी जेएसडब्ल्यू कंपनीने राज्य शासनासोबत सुमारे ३५ हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. करारानुसार जेएसडब्ल्यू कंपनी जलविद्युत व पवनऊर्जा क्षेत्रात काम करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अन्बलगन तसेच जेएसडब्ल्यू कंपनीचे सहसंचालक प्रशांत जैन, बिझनेस हेड अभय याज्ञिक, प्रवीण पुरी आदी उपस्थित होते. मंगळवारी झालेल्या दोन सामंजस्य करारांमुळे हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन या कंपनीला सर्व सहकार्य करेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

१,८७९ हेक्टरचा पवनऊर्जा प्रकल्प, ५ हजार रोजगार
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सुमारे दीड हजार मेगावॅट क्षमतेचा हायड्रोपॉवर प्रकल्प सुरू केला जाणार आहे. भावली धरणावर हा प्रकल्प असेल. यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून पाच हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार आहे. उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात ५ हजार मेगावॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प सुरू करणार आहे. १,८७९ हेक्टर जागेवर हा प्रकल्प असेल. यामध्ये सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...