आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाची दुसरी लाट तयारी:मुंबईत 37% आयसीयू खाटा रिक्त; ऑक्सिजन-औषधांची जमवाजमव

मुंबई / विनोद यादव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेची धास्ती, कशी आहे तयारी?

युरोपातील अनेक देशांत कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली. भारतातही अनेक राज्यांत दुसरी लाट दिसून येत आहे. दिल्लीत मागील एक दिवसात ८ हजार नवी प्रकरणे समोर आली. केरळमध्ये आेणमनंतर कोरोना संसर्ग वेगाने वाढला. यामुळे आम्ही भारतात कोरोनाने सर्वाधिक प्रभावित राज्य महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी काय तयारी आहे हे जाणून घेतले.

जानेवारी-फेब्रुवारीत दुसरी लाट येईल, असे सरकार सांगतेय. राष्ट्रीय पातळीवर कोविड- १९चा मृत्युदर १.४८ टक्के असताना महाराष्ट्रात सर्वाधिक २.६३ टक्के आहे. यामुळे संकट जास्त आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोरोना नियंत्रणासाठी महाराष्ट्र सरकारने चाचणी तसेच मास्कच्या किमती कमी केल्या. लोकांना एसएमएस पद्धत म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशनचे पालन करावे लागेल. ते म्हणाले, जर महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तरी राज्यात बाधित रुग्णांसाठी उपलब्ध एकूण खाटांपैकी ८० टक्के रिक्त आहेत, तर मुंबईत ६८ टक्के खाटा रिक्त आहेत. यामुळे खाटांचा तुटवडा नाही. टोपे म्हणाले, महाराष्ट्रात एक वेळ अशी होती की, रोज २५ हजार कोरोनाबाधित रुग्ण वाढत होते.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या त्यापेक्षा १०-२० टक्के जरी वाढली तरी आम्ही यासाठी तयार आहोत. राज्य सरकार यासाठी आवश्यक खाटा, डॉक्टर, नर्सेस आणि इतर साहित्याची व्यवस्था करत आहे. औषधांचा साठा करण्यास सांगण्यात आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनाही वाटते की, महाराष्ट्रातील कोविड केंद्र आणि रुग्णालयांत ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होत आहे. अनेक ठिकाणी लिक्विड ऑक्सिजनचे प्रकल्प सुरू झाले आहेत. तसेच पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटरही उपलब्ध झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना रुग्णांचे व्यवस्थापन कसे करायचे आहे हे डॉक्टर, रुग्णालय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले आहे. न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स लॅबने भारत आणि दक्षिण आफ्रिकेत जवळपास एक कोटी कोरोना चाचण्या केल्या. त्याच्याशी संबंधित पुण्यातील ए.जी. डायग्नोस्टिक्स प्रा. लि. च्या व‌ैद्यकीय संचालक डॉ. अवंती गोळविलकर-मेहेंदळे सांगतात की, मागील सहा महिन्यांत महाराष्ट्रात सुमारे ३५ टक्के जण कोरोनाने बाधित झाल्याचे मानले जात आहे. यामुळे लोकांची रोगप्रतिकारक्षमता वाढली आहे. म्हणून जर राज्यात कोविड- १९ ची दुसरी लाट आली तर ती सौम्य राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांच्या ६८ टक्के खाटा रिक्त
मुंबईत कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी डेडिकेटेड कोविड- १९ रुग्णालय, डेडिकेटेड कोविड- १९ आरोग्य केंद्र आणि कोविड- १९ केअर सेंटर, टाइप- २ (सीसीसी-२) अशा एकूण १७७०७ खाटा आहेत. यातील सध्या ६८ टक्के खाटा रिक्त आहेत. अशाच एकूण २००८ आयसीयू खाटांपैकी सध्या ३७.७० टक्के म्हणजे ७५७ खाटा रिक्त आहेत. मुंबईत ८७०५ ऑक्सिन बेड आहेत. यातील ६६.८४ टक्के आणि ११८६ व्हेंटिलेटर बेडपैकी २९.८५ टक्के म्हणजे ३४५ खाटा रिक्त आहेत.

दुकानदार-दूध घालणारे अशा लोकांच्या चाचण्या
1.
कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा ५० टक्के अतिरिक्त बफर स्टॉक ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.
2. कोरोनाविरुद्धच्या नव्या लढाईत आता रोज १० लाख लोकांमागे कमीत कमी १४० लोकांची कोविड चाचणी केली जाईल.
3. जिल्हा पातळीवर तयार केलेल्या कोविड रुग्णालयांत ऑक्सिजन खाटांची संख्या तेवढीच ठेवली जावी.
4. ज्या जिल्ह्यात २० टक्क्यांपेक्षा जास्त कोविड- १९ चे रुग्ण आढळतील तेथील सर्व कोविड रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवली जावीत. ज्या जिल्ह्यात १६-२० टक्के कोरोना रुग्ण असतील तेथे जिल्हा रुग्णालयात मल्टिस्पेशालिटी डॉक्टरांना तैनात करण्यात यावे. जेथे ११-१५ टक्के कोरोना रुग्ण असतील तेथे रुग्णसंख्येच्या २० टक्के जास्त खाटांची व्यवस्था ठेवावी.
5. ज्या जिल्ह्यांत ७ टक्क्यांपेक्षा कमी कोरोना रुग्ण असतील तेथेही कोविड रुग्णालय उपचारांसाठी सज्ज ठेवावी. ज्या जिल्ह्यांत ७-१० टक्क्यांपर्यंत रुग्ण असतील तेथील प्रत्येक तालुक्यात कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालय असावे.
6. महाराष्ट्राच्या आरोग्य संचालनालयाच्या वतीने किराणा दुकानदार, भाजीपाला व दूध विक्रेते, घरोघरी वृत्तपत्र पाेहोचवणारे विक्रेते, गॅस सिलिंडर पोहोचवणारे कर्मचारी, काम करणारे नोकर, हॉटेलचे मालक व त्यांचे वेटर, ऑटोरिक्षा तसेच टॅक्सीचालक, सुरक्षा रक्षक व कामगारांची चाचणी सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- महाराष्ट्रात चिंता अधिक, मृत्युदर २.६३%, देशाच्या सरासरीपेक्षा जास्त -सरकारचा दावा- रोज २५ हजारांपेक्षा जास्त काेराेना रुग्ण आले तरी सज्जता

बातम्या आणखी आहेत...