आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा रोजगार दर:देशात 3.9 कोटी महिला कामकाज करणाऱ्या; पुरुषांच्या तुलनेत 10 %

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्यासाठी चीनला मागे टाकण्याच्या मोडवर आहे. मात्र, काम करणाऱ्या लोकसंख्येत भारतीय महिलांची ही संख्या २० देशांत सर्वात कमी आहे. यात घट होत आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठातील अर्थतज्ञ रोजा अब्राहम यांनी सांगितले की, महिलांचा रोजगार दर २००४ मध्ये ३५% हाेता. त्यानंतर २०२२ मध्ये दर सुमारे २५% पर्यंत घसरला. आकड्यांमध्ये जे लोक आठवड्यात घराबाहेर किमान एक तास काम करतात त्यांचा समावेश होतो., या फरकाचे कारण राष्ट्रीय नोकऱ्यांतील संकट आहे. सांस्कृतिक मान्यतेनुसार, महिलांकडे घरात देखभाल करण्याच्या दृष्टीने प्रथम पाहिले जाते आणि त्यामुळे घराबाहेर पडून काम करण्यास रोखले जाते. सेंटर फॉर मॉनिटरिंग द इंडियन इकॉनॉमीनुसार(सीएमआयई) २०२२ मध्ये केवळ १०%च कामकाजाच्या महिला एकतर कार्यरत होत्या किंवा नोकरी शोधत होत्या. ३६ कोटी पुरुषांच्या तुलनेत ३.९ कोटी महिला आहे.