आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील शाळेत एकापाठोपाठ 4 सिलिंडरचा स्फोट:3 जण जखमी, शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे, परिसरालाही हादरे

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील दादर परिसरातील छबिलदास शाळेत आज पहाटे तब्बल 4 एलपीजी सिलिंडरचे स्फोट झाले. सुदैवाने शाळेत विद्यार्थी कुणी नसताना पहाटे हा स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

विद्यार्थी नसताना पहाटे सिलिंडर स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
विद्यार्थी नसताना पहाटे सिलिंडर स्फोट झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास शाळेच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या 4 सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे शाळेतील तीन कर्मचारी मात्र जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शाळेचे मोठे नुकसान

एकापाठोपाठ 4 सिलेंडर स्फोट झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. या स्फोटामुळे शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले. इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. स्फोटामुळे टेरेसचे लोखंडी पत्रे खाली पडले. शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या दोन कारचेही नुकसान झाले आहे. एकापाठोपाठ चार स्फोटांमुळे दादर परिसर हादरुन गेला होता.

शाळेच्या टेरेसचे लोखंडी पत्रे खाली पडले.
शाळेच्या टेरेसचे लोखंडी पत्रे खाली पडले.

पोलिस, अग्निशमन दलाची धाव

स्फोटाबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाने व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. सर्व जखमींना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, हे अद्याप समजू शकले नाही. अधिक तपास करत असल्याचे दादर पोलिसांनी सांगितले आहे.

छबिलदार शाळेच्या स्वंयपाकगृहात हा स्फोट झाला.
छबिलदार शाळेच्या स्वंयपाकगृहात हा स्फोट झाला.
बातम्या आणखी आहेत...