आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी दुर्घटना:4 मजली इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील 6 चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू

आशीष राय | मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुर्घटनेतून 15 जणांना वाचवण्यात यश

मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मालवानी परिसरातील एक चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. बुधवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे मालाडमधील मालवानी परिसरातील एक चार मजली इमारत रात्री 11.10 वाजेच्या सुमारास दुसऱ्या एका इमारतीवर कोसळली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या आकरा जणांमधील 9 जण एकाच कुटुंबातील असून, त्यात सहा लहान मुलांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच फायर बिग्रेड आणि पालिकेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू केले. या परिसरातील गल्ल्या आकराने लहान असल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. गल्लींची रुंदी लहान असल्यामुळे अँबुलंस, फायर ब्रिगेडची गाडी आणि जेसीबीला आत जाण्यासाठी अडचणी येत आहेत.

महापालिकेने सांगितले की, कोसळलेल्या इमारतीच्या आसपासच्या तीन इमारतीदेखील डेंजर झोनमध्ये असल्यामुळे त्यांना रिकामे करण्यात आले आहे. झोन-11 चे डीसीपी विशाल ठाकुर यांनी सांगितले की, 'आमच्या पथकाकडून रात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. आताही काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे.'

मुंबईत आज रेड अलर्ट

मुंबई आणि आसपासच्या परिसरात बुधवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात गुडघाभर पाणी साचले होते. पश्चिम उपनगर सांताक्रूजमध्ये बुधवारी सकाळी 8 पासून दुपारी अडीच वाजेपर्यंत 164.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यानंतर हवामान विभागाने आजही मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...