आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदार आणि खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर रवाना झाले. शनिवारी रात्री लखनऊ विमानतळावर पोहोचताच ‘जय श्रीराम’चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांंचे जंगी स्वागत करण्यात आले.
अयोध्येला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर शिवसेनेच्या आमदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुख्यमंत्री शिंदे आपल्या ताफ्यासह रात्री लखनऊमध्ये मुक्काम करतील. त्यानंतर रविवारी अयोध्येत हनुमान गढीवर पूजा करून दुपारी राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे भाजप नेतेही मुख्यमंत्र्यांसोबत अयोध्या दाैरा करणार आहेत. ते रविवारी अयोध्येत दाखल होतील.
तत्पूर्वी, विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्येष्ठ नेते रामदास कदम म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातून चांगले काम व्हावे म्हणून प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अयोध्येला जात आहोत. आता चोर कोण ते लवकरच स्पष्ट होईल. लवकरच दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल. तर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मागच्या वर्षी विमानतळावरून आम्हाला माघारी परतावे लागले होते. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना अयोध्या दौऱ्याबाबत आग्रह केला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.