आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:देशात 4.12 लाख कोट्यधीश; 6.33 लाख नवीन मध्यमवर्गीय कुटुंबे वाढली, मुंबई सर्वात श्रीमंत शहर, 17 हजार काेट्यधीश

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हुरुन इंडियाच्या वेल्थ रिपोर्टमध्ये नव्या मध्यमवर्गीय कुटुंबांची वार्षिक सरासरी बचत 20 लाख रुपये
  • राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल, यूपी दुसऱ्या, तामिळनाडू तिसऱ्या स्थानी
  • रिअल इस्टेट आणि शेअर बाजार गुंतवणुकीसाठी सर्वात चांगले साधन

देशात कोट्यधीश आणि मध्यमवर्गीय कुटुंबांत वाढ झाली आहे. हुरुन इंडियाच्या मंगळवारी जारी वेल्थ रिपोर्ट २०२० नुसार, महामारी असूनही देशात ४.१२ लाख नवीन कोट्यधीश आणि ६.३३ लाख नवीन मध्यमवर्गीय कुटुंबे वाढली आहेत. नव्या कोट्यधीशांमध्ये ३००० कुटुंबे अशी होती, ज्यांची नेटवर्थ १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती आणि ते ‘सुपर रिच’च्या श्रेणीत समाविष्ट झाले. नवीन मध्यमवर्गीय कुटुंबांबाबत बोलायचे तर या कुटुंबांत २० लाख रुपयांची वार्षिक सरासरी बचत नोंदली गेली. त्याचबरोबर त्यांच्याकडे आपले घर आणि महाग वाहनेही होती. सामान्य मध्यमवर्गीयांची संख्या ५.६४ कोटी आहे. त्यांची वार्षिक कमाई अडीच लाख रुपये असून एकूण संपत्ती ७ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. १६,९३३ कोट्यधीशांसह मुंबई सर्वात श्रीमंत शहर ठरले आहे.

अहवालानुसार, देशातील श्रीमंत कुटुंबे दोन भागांत वाटली गेली आहेत. पहिले म्हणजे काही काम केल्याने ज्यांना उत्पन्न मिळते. त्याचबरोबर त्यांच्याकडे फिक्स डिपॉझिट (एफडी) आहे आणि रिअल इस्टेट आणि शेअरमध्ये गुंतवणुकीद्वारेही त्यांना उत्पन्न मिळते. दुसरे म्हणजे जी खानदानी श्रीमंत कुटुंबे आहेत आणि श्रीमंती त्यांना वारश्याने मिळाली आहे. त्यांच्याकडे रिअल इस्टेट तर आहेच, शिवाय बस्तान बसलेला व्यवसायही त्यांना मिळाला आहे, त्याद्वारे त्यांचे उत्पन्न सतत कायम राहते. त्याशिवाय कुटुंबाने खूप पूर्वी शेअर बाजारात जो पैसा गुंतवला होता, तोही डिव्हिडंडमार्फत या कुटुंबांचे उत्पन्न वाढवतो. मुंबईत १६,९३३ कोट्यधीश कुटुंबे आहेत, त्यांचा देशाच्या जीडीपीत ६.१६%चा वाटा आहे. १६ हजार कोट्यधीशांसह नवी दिल्ली दुसऱ्या आणि कोलकाता १० हजार कोट्यधीशांसह तिसऱ्या स्थानी आहे. राज्यांबाबत बोलायचे तर ५६ हजार श्रीमंतांसह महाराष्ट्र अव्वल आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरातचा क्रमांक आहे.

हुरुन इंडियाच्या रिपोर्टसाठी ज्या श्रीमंतांमध्ये सर्व्हे करण्यात आला होता, त्यातील ७२% नी सांगितले की, ते २०१९ च्या तुलनेत आता व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनातही खुश आहेत. त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे रिअल इस्टेट आणि शेअर बाजार गुंतवणुकीसाठी सर्वात चांगले साधन ठरले. परदेश प्रवासासाठी स्वित्झर्लंड, अमेरिकेनंतर ब्रिटनला पसंती मिळाली. गुंतवणुकीसाठी सिंगापूर आणि यूएईनंतर अमेरिकेलाच सर्वांची पसंती होती. विदेशात शिक्षणाबाबतही अमेरिकेला सर्वांची पसंती आहे. आवडीबाबत बोलायचे तर बहुतांश लोकांचा कल कलाकृतींचा संग्रह करण्याकडे राहिला.

बातम्या आणखी आहेत...