आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मी मंदिर:लक्ष्मी, महाकाली, सरस्वती मूर्तींसाठी दिवाळीत 45 कोटींचा साज शृंगार

मुंबई / मनीषा भल्लाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात ५५० किलो चांदीच्या सिंहासनावर विराजमान महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या दर्शनासाठी नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत रोज दीड लाख भाविक येतात. या मंदिराची स्थापना कोणीही केलेली नसून, याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे स्वयंभू मंदिर आहे. येथे दिवाळीत तिन्ही दिवस तिन्ही देवींचा विशेष साज शृंगार केली जाते. एका देवीच्या मूर्तीवर सुमारे १५ कोटी रुपयांच्या दागिने चढवले जातात. तीन देवींसाठी सुमारे ४५ कोटींचा हा साज शृंगार असतो.

मंदिराचे पुजारी अरुण लक्ष्मण वीरकर यांनी सांगितले की, सप्तशतीत वर्णन केल्याप्रमाणेच हे मंदिर आहे. प्रत्येक मंदिर पूर्वेला हवे, त्याप्रमाणे हे मंदिर समुद्रकिनारी पूर्व दिशेला आहे. शास्त्रात लिहिल्याप्रमाणे ‘समुद्र वसने देवी...’ म्हणजे समुद्रकिनारी वास्तव्य असणारी. उजवीकडे अरबी समुद्र, तर डावीकडे मुंबई नगरी. मंदिरात महालक्ष्मी मध्यभागी, त्यांच्या डावीकडे महाकाली आणि उजवीकडे महासरस्वती देवी आहेत. देवीचा मुकुट शुद्ध सोन्याचा असून त्याचे वजन ५ किलोपर्यंत आहे. तिन्ही देवींच्या मुखावर चांदी आणि तांबे यांचे आवरण आहे. दिवाळीत सोन्याचे आवरण चढवले जाते. मंदिर संस्थानचे वरिष्ठ व्यवस्थापक एस. व्ही. पाध यांनी सांगितले की, मंदिराच्या देखभालीसाठी १९५२ मध्ये ट्रस्ट बनवण्यात आला होता. मंदिरात वर्षाकाठी सुमारे १९ कोटी रुपयांचे दान येते.

मुंबई १७६१ मध्ये सात बेटांचे शहर होते. मंदिरासंबंधी आख्यायिकेनुसार, या सातपैकी एका बेटावर महालक्ष्मीचा निवास होता. व्यापाराच्या दृष्टीने सात बेटांत विखुरलेली मुंबई जोडण्याचे काम सुरू झाले. लॉर्ड हाननी यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू झाले. कामाचे कंत्राट शिवाजी प्रभू यांच्याकडे होते. रस्ता तयार करण्यासाठी जेवढी भर घातली जायची, ती लाटांमुळे वाहून जायची. कंत्राटदार आणि इंग्रज यांमुळे हैराण झाले. नंतर देवीने कंत्राटदाराच्या स्वप्नात येऊन सांगितले की, आम्ही समुद्रात आहोत, आम्हाला बाहेर काढा आणि प्रतिष्ठापना करा, तेव्हाच रस्ता होईल. सकाळी तसेच करण्यात आले. १७८४ मध्ये रस्ता तयार झाला. चोर आणि दरोडेखोरांपासून देवींच्या मूर्ती सुरक्षित राहाव्यात यासाठी त्या समुद्रात टाकण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...