आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत 4500 किलो प्रतिबंधित ड्रग्ज जप्त:बोरिवलीमध्ये लपवला होता नायट्राझेपम गोळ्याचा साठा; आरोपीला अटक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) 4500 किलो प्रतिबंधित ड्रग्ज जप्त केले आहेत. जप्त केलेल्या गोळ्या नायट्राझेपम असल्याचे सांगितले जात आहे. या प्रतिबंधित गोळ्या पश्चिम उपनगरातील बोरिवली परिसरात लपवून ठेवण्यात आल्या होत्या.

एनसीबीने एका गुप्तचराच्या माहितीवरून बुधवारी कुलाबा परिसरातून नुरुद्दीन शेख नावाच्या 37 वर्षीय व्यक्तीला अटक केली होती. त्यांनी एनसीबीला 7500 नायट्राझेपम गोळ्यांची (4500 किलो) माहिती दिली. या गोळ्या निद्रानाशाच्या गोळ्या म्हणून वापरल्या जातात. खुल्या बाजारात त्याची किंमत लाखोंमध्ये असल्याचा अंदाज आहे. अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.

कालही मुंबई वितानतळावर कारवाई
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ने तब्बल 80 कोटी रुपयांचे 16 किलो ड्रग्स जप्त केले आहे. या प्रकरणी एका ड्रग्स तस्कराला अटक करण्यात आली आहे. या तस्कराने ड्रग्ज लपवण्यासाठी आपल्या बॅगेत एक खास व्यवस्था केली होती. हा आरोपी विमानतळावर पोहचताच . आरोपी विमानतळावर पोहोचताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झाडाझडती केली. त्याच्याकडील वस्तूंचीही तपासणी केली पण त्यात काही सापडले नाही. पण त्याची ट्राॅली बॅग तपासली असता, या बॅगमध्ये बनलेल्या फेक कॅव्हिटीमधून ड्रग्ज जप्त करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...