आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरिक्त बसेस उपलब्ध:आषाढीला 4700 एसटी धावणार, परिवहनमंत्री अनिल परब यांची घोषणा

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर यंदा पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी बुधवारी केली. ६ जुलै ते १४ जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावतील. वाखरी येथील माउलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (८ जुलै) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचे संकटात वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारीऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्यात आल्या होत्या. दोन वर्षानंतर यंदा वारी सोहळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पंढरपूर येथे विशेष बैठक झाली. आज एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी पंढरपूर यात्रेसाठी सुमारे ४७०० गाड्या सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. औरंगाबाद विभागातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १०००, तर अमरावती येथून ७०० अशा विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले .

चार तात्पुरती स्थानके : प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येतील.

-चंद्रभागा बसस्थानक -मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर तालुक्यात जाणाऱ्यांसाठी. - भीमा यात्रा देगाव - औरंगाबाद, नागपूर व अमरावती येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी - विठ्ठल कारखाना - नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी - पांडुरंग बसस्थानक - सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी.

बातम्या आणखी आहेत...