आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन:बजाज फायनान्सला 4750 कोटी रुपयांचे नुकसान; संकट टाळण्यासाठी आखले धोरण 

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मार्चच्या अखेरीस १.४७ लाख रुपयांच्या मालमत्ता व्यवस्थापनात केवळ २ टक्क्यांची वाढ झाली आहे

कोरोनाच्या संकटामुळे बजाज फायनान्सला मार्च महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत ३.५ लाख खाती व ४७५० कोटी रुपयांच्या मालमत्ता व्यवस्थापनाचा फटका बसला आहे. नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापनाने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करताना ही माहिती दिली. व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार जुलैपर्यंत व्यवसाय सुरू हाेऊ शकेल आणि अॉक्टोबरपर्यंत स्थिती सामान्य होईल. बजाज फायनान्सने सांगितले की, मार्चच्या अखेरीस १.४७ लाख रुपयांच्या मालमत्ता व्यवस्थापनात केवळ २ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या तिमाहीत मालमत्ता व्यवस्थापन १.४५ खर्व रुपये होते. गेल्या वर्षी या तिमाहीत मालमत्ता व्यवस्थापनात ४० टक्क्यांची वाढ झाली होती. तर यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत आकडेवारी केवळ २७ टक्के राहिली. स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या तिमाही अपडेटमध्ये बजाज फायनान्सने स्पष्ट केले की, चालू आर्थिक वर्षात पत खर्चात वाढ होऊ शकते. कंपनीने म्हटले आहे की, ऑक्टोबरपर्यंतची तयारी कंपनीने केली असली तरी सध्या नवीन शाखा उघडली जाणार नाही. नोकर भरती होणार नाही आणि प्रवास खर्चात ८० टक्के कपात होईल. विशेष म्हणजे कंपनीने आधीच एकूण २ कोटी कर्जदारांपैकी सुमारे १२ लाख जणांना कर्ज चुकवण्यासाठी सवलत दिली आहे. यातील ९ लाख जण नॉन ऑटो कर्जांतर्गत, तर ३ लाख ऑटो लोन अंतर्गत आहेत.

संकट टाळण्यासाठी धोरण आखले

व्यवस्थापनाने लॉकडाऊनच्या कालावधीच्या आधारे तीन प्रकारची रणनीती आखली आहे. पहिल्या नुसार जर १४ एप्रिल रोजी लाॅकडाऊन उठवण्यात आले तर कंपनीला मेपर्यंत सामान्य व्यापार ६०% आणि सप्टेंबरपर्यंत १००% पुनरागमन होण्याची अपेक्षा आहे. तेव्हा वाढ आणि नफ्यावर जास्त प्रभाव पडणार नाही. दुसऱ्यात, जर ३० एप्रिलला लॉकडाऊन उठवण्यात आले तर ऑक्टोबरपर्यंत स्थिती सामान्य होण्याची आशा आहे. पत खर्च किंवा अडकलेल्या कर्जात ५० ते ६० टक्क्यांनी वाढ होईल. 

बातम्या आणखी आहेत...