आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 24 तासांत 47,827 नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 29 लाख; 3.89 लाख सक्रिय रुग्ण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. गुरुवारी मोठ्या संख्येने नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली. - Divya Marathi
मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. गुरुवारी मोठ्या संख्येने नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली.

महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने कहर केला. गेल्या २४ तासांत राज्यांत तब्बल ४७,८२७ नवीन काेरोना रुग्ण वाढले आहेत. ही काेरोना महामारी सुरू झाल्यापासूनची उच्चांकी संख्या आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २९ लाख ४,०७६ वर पाेहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही ३ लाख ८९,८३२ वर गेली आहे. गुरुवारी २०२ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या ५५,३७९ झाली आहे. दुसरीकडे, दिवसभरात २४,१२६ रुग्ण बरे हाेऊन घरीही परतले.राज्यातील एकूण कोरोनामुक्तांचा आकडा आता २४ लाख ५७,४९४ झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.६२ टक्क्यांवर आले आहे. राज्याचा मृत्युदर १.९१% इतका आहे.

आजवर २.१ कोटी चाचण्या : राज्यात आजवर २ कोटी १ लाख ५८,७१९ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १४.४१ टक्के जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २१ लाख १,९९९ जण होम क्वॉरंटाइन, तर १९,२३७ जण संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.

पुणे शहरात सात दिवस मिनी लॉकडाऊन, संचारबंदी लागू
पुणे | रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शनिवारपासून सात दिवस पुण्यात सायंकाळी सहा ते सकाळी सहा संचारबंदी लागू राहील. पीएमपीएल बस, हॅाटेल, रेस्टॅारंट, बार, चित्रपटगृहे, धार्मिक स्थळे बंद राहतील. मात्र, हॅाटेल्समधून पार्सल सेवा सुरू असेल. नियमांचे काटेकोर पालन करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

औरंगाबादसह राज्यातील आठ जिल्ह्यांत निर्बंध?
मुंबई |आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ८ जिल्ह्यांत निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहेत. रुग्णांच्या आकडेवारीमध्ये देशात टॉप टेनमध्ये असलेल्या पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड,अहमदनगर या आठ जिल्ह्यांमध्ये हे निर्बंध लागू केले जाऊ शकतात.

विदर्भ : काेराेनाचे ८०५३ नवे रुग्ण, ८९ बाधितांचा मृत्यू
अमरावती | विदर्भात गुरुवारी ८०५३ नवे रुग्ण आढळून आले. ८९ जणांचा मृत्यू झाला. मृतांत पूर्व विदर्भातील ६९ जणांपैकी नागपूरच्या ६०, तर भंडारा येथील ३, वर्धा ४, तर चंद्रपूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. पश्चिम विदर्भात २० जणांचा मृत्यू झाला. यात अमरावती ४, यवतमाळ ७, बुलडाणा जिल्ह्यातील ५ आणि अकाेल्यातील ४ जणांचा समावेश आहे. नागपूर विभागात गुरुवारी ५९५०, तर अमरावती विभागात २१०३ नवे रुग्ण आढळले. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ९३ हजार २६३ वर पोहोचली.

मराठवाड्यात ५१६३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, 84 मृत्यू
मराठवाड्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. विभागात शुक्रवारी ५१६३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ८४ जणांचा मृत्यू झाला. ४००८ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या मराठवाड्यात २८ हजार ९५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी औरंगाबाद १,४२७, जालन्यात ४९३, परभणी ३६७, हिंगोली १७६, नांदेड १२४६, लातूर ७६९, उस्मानाबाद २९२, बीड ३९३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर नांदेडमध्ये २३, जालना ९, उस्मानाबाद ७, परभणी ६, हिंगोली ४, बीडमध्ये दोघांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...