आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने केलेल्या कारवाईत जीएसटीची ४८ कोटी रुपयांची खोटी बिले देणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. जीएसटीची खोटी बिले देत असल्याचा संशय असलेल्या मे. विवांता मेटल कॉर्पोरेशन या व्यापाऱ्यांसंबंधी राज्य वस्तू व सेवा कर विभागाने विशेष तपास हाती घेतला होता. मे. विवांता मेटल कॉर्पोरेशनचा मालक इम्तियाज अब्दुल रेहमान सय्यद (३५, रा. चिता कॅम्प, मानखुर्द, मुंबई) याने कुठल्याही वस्तू किंवा सेवेची खरेदी-विक्री न करता सुमारे ४८ कोटी किमतीच्या खोट्या बिलांवर आधारित सुमारे ८.७० कोटी रुपयाचे इनपुट ट्रॅक क्रेडिट (आयटीसी) म्हणजेच त्याला देय असलेल्या जीएसटी रकमेवर ८.७० कोटी रुपयांची खोटी वजावट घेतली. याच स्वरूपाची खोटी बिले इतर कंपन्यांना जारी केली. ही रक्कमदेखील सुमारे ९ कोटींच्या घरात आहे.
याप्रकरणी अस्तित्वात नसलेल्या अशा बोगस कंपन्यांकडून बिले घेऊन कर भरणे टाळणे, हा वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर ५ ऑगस्ट २०२२ रोजी वस्तू व सेवा कर विभागाने इम्तियाज अब्दुल रेहमान सय्यदला अटक करून न्यायालयात हजर केले. मुंबईच्या अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.