आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एन्ड्रेस हाऊझर, सिमेन्ससोबत 5 लघुउद्योजकांना कामाची संधी:अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पोत 24 हजार लोकांची हजेरी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यासह औरंगाबादमधील उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पोमध्ये दुसऱ्या दिवशी तब्बल २४ हजार नागरिकांनी हजेरी लावली आहे. सिमेन्स आणि एन्ड्रेस हाऊझरच्या बी-टू-बी अंतर्गत ५ लघुउद्योगांना काम करण्याची संधी मिळाली आहे.

या उद्योगांमध्ये निर्मितीसाठी लागणारे सुटे भागांची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांशी दोन्ही कंपन्यांनी संवाद साधत पाच लघुउद्योजकांसोबत कामाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. शुक्रवारी या ठिकाणी इन्हेस्ट इंडियाच्या सदस्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. देशातील परदेशी गुंतवणूकीच्या प्रक्रियेचे यावेळी सहभागी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गुंतवणूकदाराच्या गरजा लक्षात घेऊन जागेचे पर्याय आणि रोजगार निर्मिती या मुद्द्यांवरही संवाद साधण्यात आला. प्लास्टिक उद्योगांना निर्यातीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निर्मिती व निर्यात यातील संधींची माहिती उद्योजकांना देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...