आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • 5 Stories Of Selfless Service From Maharashtra: Pune A Woman From Pune Is Giving Free Tiffin To Frontline Workers Every Day, In Mumbai Spiderman Sanitize The City; News And Live Udpates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकटातील रियल हिरो:कुणी कोरोना वॉरियर्सला देतेय विनामूल्य टिफीन, कुणी स्पायडरमॅन होऊन शहर स्वच्छ करतोय स्वच्छ तर कुठे मशिदीतून होतोय ऑक्सिजन पुरवठा

मुंबई23 दिवसांपूर्वीलेखक: आशीष राय
  • कॉपी लिंक
  • देशात दररोज 3 लाखांवर रुग्ण आढळून येत आहे

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे संसर्गांचा वेग झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, देशात दररोज 3 लाखांवर रुग्ण आढळून येत आहे. कोरोना महामारीने भयावह रुप धारण केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आणि अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. यामुळे रुग्णांसह नातेवाईकांचीदेखील मोठी पंचाईत निर्माण होत आहे. या सर्व परिस्थितीत लोक आपल्या घराच्या बाहेर निघण्यास घाबरत आहे. सगळीकडे नकारात्मक असे वातावरण तयार झालेले असताना काही लोक आपला जीव धोक्यात घालून लोकांची मदत करत आहे.

यासर्व परिस्थितीत दिव्य मराठीच्या टीमने या नकारात्मक वातावरणात पॉझिटिव्हिटी तयार करण्यासाठी कोरोनाकाळातील अशा पाच रियल हिरोंची गोष्ट समोर घेऊन येत आहे.

पुण्याच्या 'स्कॉटिश गर्ल'ने 1500 लोकांना पोहचवला टिफिन
आकांक्षा साडेकर ही पुण्याची रहिवाशी असून ती गेल्या 22 वर्षांपासून स्कॉटलँडमध्ये वास्तवाला होती. त्यामुळे त्याचे सर्व मित्र परिवार तीला 'स्कॉटिश गर्ल' नावाने बोलवतात. आकांक्षा ही गेल्या 5 एप्रिलपासून फ्रंटलाईनवर काम करीत आहे. ती स्वत:च्या हाताने जेवण तयार करुन डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना टिफिन पुरवत असे. तीने कोरोनाकाळात आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त लोकांना टिफिन दिले आहे.

आकांक्षा साडेकर ही आरोग्य कर्मचारऱ्यांसह रस्त्यावर असणाऱ्या बेघर आणि भुकलेल्यांना अन्न पुरवण्याचा काम करीत आहे. तीने @scottishladki या नावाने ट्विटरवर अंकाऊट तयार केले असून गरजू लोक तीच्या अंकाऊटवर जात आपले नाव आणि संपूर्ण पत्ता देतात. दरम्यान, त्यांना दुसऱ्या दिवशी टिफिन मिळत असते.

180 किलोमीटरचा प्रवास करत सेवा देण्यासाठी नागपूर पोहचली डॉक्टर
मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवाशी डॉ. प्रज्ञा घरडे ही नागपुरातील कोविड सेंटरमध्ये आरएमओ पदावर कार्यरत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ती आपल्या घरी सुट्टी साजरी करायला आली होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सक्रीय रुग्णांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर तीला नागपूर शहरांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याची माहिती मिळाली. तीने आपली सुट्टी अर्धातच सोडत आपल्या आपल्या स्कुटीने 180 किलोमीटरचा प्रवास करत आपली ड्यूटी जाईन केली.

स्पायडरमॅन मुंबईतील बसस्थानकांला करत आहे सॅनिटाईज
मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते आणि सायन फ्रेंड सर्कल फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक कुर्मी हे गेल्या काही दिवसांपासून स्पायडरमॅन बनत शहरांतील प्रमुख ठिकाणे सॅनिटाईज करत आहे. दरम्यान, स्वत:च्या पाठीवर सॅनिटाईजची टाकी बांधत सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता करण्याचा काम करत आहे. शहरांतील बसस्थानकासह बसगाड्या स्वच्छ करण्याचा कामेदखील हा स्पायडरमॅन अशोक करीत असतो.

मुंबईतील मशिदीतून मोफत ऑक्सिजन पुरवठा
मुंबईतील कुंभारवाडा भागात असलेल्या फुल मस्जिदमध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा मोठा साठा ठेवण्यात आला आहे. मशिदीतून दररोज शेकडो घरांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. येथील मौलाना सरफराज मन्सूरी म्हणतात सांगतात की, मुंबईतील रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच ऑक्सिजनच्या अभावामुळे दररोज बरेच लोक मरत होते. लोकांना प्राथमिक मदत मिळावी म्हणून गेल्या वर्षभरापासून ते विनामूल्य ही सेवा चालवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...