आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतील हृदयद्रावक घटना:खेळता-खेळता लिफ्टमध्ये अडकल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, दोन बहिणी थोडक्यात वाचल्या

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील धारावी परिसरात एक दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. येथील एका पाच वर्षीय चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला. यादरम्यान त्याच्या दोन बहिणीदेखील लिफ्टमध्ये होत्या, पण त्या काही सेकंदापूर्वीच लिफ्टमधून बाहेर पडल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.

अशी घडली घटना

धारावी पोलिसांनी सांगितले की, ही दुर्घटना धारावीतील घोषी शेल्टर बिल्डिंगमध्ये घडली. येथील हुजैफा नावाचा पाच वर्षीय मुलगा आपल्या दोन बहिणींसोबत ग्राउंड फ्लोअरवर खेळत होता. खेळता-खेळता तिघे लिफ्टमध्ये गेले आणि फोर्थ फ्लोअरकडे निघाले. चौथ्या फ्लोअरवर लिफ्ट येताच दोन बहिणी पटकन बाहेर पडल्या. यानंतर हुजैफा निघण्यापूर्वीच लिफ्टचा लाकडी दरवाजा बंद झाला आणि हुजैफा लाकडी दरवाजा आणि लोखंडी गेटमध्ये अडकला. यादरम्यान कुणीतरी लिफ्टचे बटन दाबले आणि यात अडकून चिमुकल्याचा जीव गेला. याप्रकरणी पोलिसांनी अॅक्सीडेंटल डेथची रिपोर्ट दाखल केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser