आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुवाहाटीच्या मुख्यमंत्र्यांसोबत शिंदेंची बैठक:कामाख्या देवीचा नवस फेडायला शिंदेंसह 50 आमदार पुन्हा गुवाहाटीला जाणार

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ५० आमदार, १३ खासदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहेत. शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदे कामाख्या देवीला नवस बोलले होते, तो नवस फेडण्यासाठी हा दौरा आखल्याची माहिती शिंदे गटातील सूत्रांनी दिली आहे.

दौऱ्यादरम्यान शिंदे गुवाहाटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि पोलिस आयुक्तांना भेटतील. जून महिन्यात राज्यातील राजकीय घडामोडींच्या काळात शिंदे यांना आसामच्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांना भेटणार आहेत. या दौऱ्यात कामाख्या देवीच्या मंदिरात शिंदेंकडून विशेष पूजेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. आमदारांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी की रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लावण्यासाठी हा दौरा आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुन्हा एकदा शहाजीबापूंची चर्चा : आसामची राजधानी दिसपूरजवळ गुवाहाटी असून तेथून ८ किमी अंतरावर नीलांचन पर्वत परिसरात कामाख्या देवीचे मंदिर आहे. तेथील निसर्गसौंदर्याविषयी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा “काय ती झाडी, काय तो डोंगार अन् काय ते हाटील...’ हा डायलॉग प्रचंड गाजला होता. त्यांच्यासह आमदारांची आता पुन्हा चर्चा होत आहे.

मनोकामना पूर्ण करणारी म्हणून कामाख्या देवीची आख्यायिका : कामाख्या देवी ही तांत्रिक- मांत्रिकांसाठी महत्त्वाचे दैवत मानले जाते. कामाख्याची पूजा भगवान शंकराच्या नववधूच्या रूपात केली जाते. कामाख्या देवी मुक्ती देते आणि सर्व इच्छाही पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिर परिसरात भक्ताने कोणतीही इच्छा व्यक्त केली की ती पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून देवीची देशभरात ख्याती आहे.

गुवाहाटीच्या मुख्यमंत्र्यांसोबत शिंदेंची बैठक : या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यता आली आहे. ही बैठक पर्यटनवाढीविषयी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाविषयी काही सामंजस्य करार या दौऱ्यात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बंडाच्या सहा महिन्यांनंतर २६-२७ नोव्हेंबरला दौरा {या दौऱ्यात १५० जण सहभागी असतील त्यात शिंदे गटाचे आमदार, खासदार तसेच बंडाच्या काळात चोख काम बजावलेले बिनीचे शिलेदार यांचा समावेश आहे. {दोन मोठी विमाने या दौऱ्यासाठी बुक करण्यात आली आहेत. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईहून निघून २७ नोव्हेंबर रोजी रात्री ही मंडळी मुंबईत परतणार आहेत. {हा दौरा यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या विश्वासातील खास लोक गुवाहाटीत पोहोचले आहेत. तेथे ते सर्व तयारी करत असल्याचे समजते.

मुख्यमंत्री शिंदेंचा नवस : गुवाहाटीत २४ आणि २८ जून असे दाेन वेळा एकनाथ शिंदे यांनी आमदारांसमवेत कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. राज्यामध्ये सत्ता आली तर सर्वांना घेऊन दर्शनाला येईन,’ असा नवस ते बोलले होते. तो फेडण्यासाठी शिंदे आता गुवाहाटीला चालले आहेत.

बातम्या आणखी आहेत...