आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात नव्या कोरोना रुग्णांसोबत यातून पूर्ण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता जवळपास सारखी झाली आहे. यादरम्यान देशात मृत्यूचा आकडा दीड लाखाच्या वर गेला असून यात महाराष्ट्राच्या नावे वेगळाच पण वाईट विक्रम नोंदवला गेला आहे. या राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५० हजारांहून अधिक झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या ५०,०२७ झाली. आता महाराष्ट्र हे ५० हजारांहून अधिक मृत्यू झालेले जगातील एकमेव राज्य ठरले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क स्टेट दुसऱ्या स्थानी आहे. येथे ३९ हजार २९८ मृत्यू झाले आहेत. मृत्यूंबाबत अमेरिकेसह सर्वात बाधित १० देश सोडले तर उर्वरित देशांत महाराष्ट्रापेक्षा कमी मृत्यू झाले आहेत.
आता देशात १८.०२ कोटी चाचण्या : देशात कोरोना चाचण्यांची संख्या शनिवारी १८,०२,५३,३१५ झाली. २४ तासांत ९,१६,९५१ चाचण्या झाल्या. विशेष म्हणजे १ जानेवारीपासून आतापर्यंत ७१,४१,६२१ चाचण्या झाल्या आहेत. म्हणजे सुमारे ९ लाख चाचण्या रोज. कोरोना चाचण्यांबाबत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक २६.७८ लाख चाचण्या अमेरिकेत झाल्या आहेत. याशिवाय चीनसह उर्वरित देश भारताच्या तुलनेत पिछाडीवर आहेत.
महाराष्ट्र : १९.६५ लाख रुग्ण, पैकी १८.६१ लाख कोराेनामुक्त
राज्यात शनिवारी एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १९ लाख ६५,५५६ वर पोहाेचली आहे. राज्यभरात ३,५८१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. मृतांची संख्या ५७ ने वाढून ५०,९२७ वर गेली आहे. राज्यात आज रोजी ५२ हजार ९६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे १९.६५ लाखांपैकी तब्बल १८ लाख ६१,४०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी २,४०१ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. राज्याचा रिकव्हरी रेट ९४.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदरही २.५५ टक्क्यांवर आला आहे.
----
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.