आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालबागच्या चरणी 5.1 कोटींचे दान:राजाच्या दानपेटीत मंगळवारपर्यंत 3 किलो सोने, 40 किलो चांदी अर्पण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लालबागचा राजा, जीएसबी या मुंबईतील तर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, कसबा गणपती, गुरुजी तालीम या गणपतींच्या दर्शनासाठी यंदा मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी दानपेटीत ५ ते १० कोटींचे विक्रमी दान पडल्याचा अंदाज मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. लालबागच्या राजाच्या दानपेटीत पहिल्या चार दिवसांतच दीड कोटी दान जमा झाले होते.

कोरोनापूर्व काळात लालबागच्या राजाच्या दानपेटीत १० दिवसांत ७ कोटी, तर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दानपेटीत ३ कोटी रुपयांचे दान संकलित होत असे. लालबागच्या राजाच्या दानपेटीत यंदा मंगळवारपर्यंत ३ किलो सोने, ४० किलो चांदी आणि ३.३५ कोटी रोकड अशी एकूण ५.१ कोटींचे दान जमा झाले होते. दहा दिवसांत हा आकडा १० कोटींच्या घरात गेल्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये राजाच्या दानपेटीत ८ कोटींचे दान पडले होते. त्यात साडेपाच किलो सोने, ७५ किलो चांदी होती. यंदा पहिल्या ४ दिवसांतच एवढे दान जमा झाले आहे.

यापूर्वी २००८ मध्ये लालबागच्या राजाच्या ७५ व्या वर्धापनदिनी सर्वाधिक म्हणजे ११.५ कोटींचे दान आले होते. यंदा हा आकडाही पुढे जाण्याची शक्यता आहे. निर्बंध हटल्यानंतरचा भक्तांच्या उत्साहाचा व भक्तीचा महापूर बघता गणेश मंंडळांच्या दानपेटीतील भक्तांचे दान व देणग्याही यंदा विक्रमी उंची गाठण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी यंदा राजकीय नेते, अभिनेते यांनीही मोठी गर्दी केली होती.

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या या गणपतीच्या दानपेटीत भक्तांचे पात्र दान मोठ्या प्रमाणात पडते. कोरोनाच्या संकटानंतर यात मोठी वाढ झाल्याचा अंदाज आहे. लालबागच्या राजाप्रमाणेच खेतवाडीचा राजा, चिंचपोकळीचा राजा या सार्वजनिक गणेश मंडळांनाही मोठी दाने व देणग्या मिळाली आहेत. जीएसबी गणपती मंडळाने तर ६६ किलो सोने व २९५ किलो चांदीचा मूर्तीतच वापर केल्याने ३०० कोटींचा विमाही उतरवला होता. रोख रकमेसोबतच चांदी-सोन्याचे दागिने, प्रतिमा आणि बिस्किटे दानपेटीत टाकण्यात येतात. गणेशोत्सवानंतर धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली या दानपेट्या उघडून पात्र दानाचे मोजमाप केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...