आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅक फंगस:राज्यात म्यूकरमायकोसिसमुळे 52 जणांचा मृत्यू; सर्वच जण कोरोनातून झाले हाेतेे बरे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • म्यूकरमायकोसिसची समस्या मधुमेह झालेल्यांना अधिक

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग काळातच म्यूकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगसमुळे आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, म्यूकरमायकोसिसचा संसर्ग कोरोनातून बरे होत असलेल्या आणि झालेल्या काही रुग्णांमध्ये दिसत आहे. या रुग्णांत डोकेदुखी, ताप, डोळ्यांत वेदना, नाकात संसर्ग आणि अंशत: दृष्टिबाधा अशी लक्षणे दिसत आहेत. या अधिकाऱ्याने सांगितले की, म्यूकरमायकोसिसमुळे ज्या ५२ लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी सर्व जण कोरोनातून बरे झाले होते. राज्याच्या आरोग्य विभागाने प्रथमच म्यूकरमायकोसिसमुळे मृत्यू झालेल्यांची यादी तयार केली आहे. तत्पूर्वी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले होते की, राज्यात म्यूकरमायकोसिसचे १५०० रुग्ण आहेत. रुग्ण वाढल्याने राज्याच्या आरोग्य विभागावर बोजा वाढू शकतो. म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारांसाठी एक लाख अॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन खरेदीसाठी राज्य सरकार निविदा काढणार आहे.

म्यूकरमायकोसिसची समस्या मधुमेह झालेल्यांना अधिक
आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले की, ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांच्या रक्तशर्करा स्तरात चढ-उतार होतो अथवा ज्यांच्या रक्तात लोहाचे प्रमाण जास्त आहे, अशा कोरोना रुग्णांना म्यूकरमायकोसिस होतो. राज्य सरकारने अशा रुग्णांच्या उपचारांसाठी १८ वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांत वेगळा वॉर्ड बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...