आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:मुंबई पालिकेचा 52 हजार 619 कोटींचा अर्थसंकल्प ; निवडणुकीपर्यंत मुंबईकरांना करवाढीचा दिलासा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकीच्या तोंडावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील ५२ हजार ६१९ कोटी रुपये मोठे आकारमान असलेला अर्थसंकल्प शनिवारी (४ फेब्रुवारी) पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सादर केला. निवडणुका तोंडावर असल्याने कोणतीही करवाढ न करता मुंबईकरांना खुश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात असला तरी निवडणुकीनंतर मालमत्ता करवाढीचे संकेतही दिले आहेत.

या अर्थसंकल्पात नव्या प्रकल्पांची घोषणा नसली तरी मुंबईचे सौंदर्यीकरण, कोस्टल रोड, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नागरी सुविधा, मुंबई वायुप्रदूषण कृती योजना, काँक्रीटचे रस्ते, पूल, मलनिस्सारण, आरोग्य शिक्षण यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. परिणामी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छाप अर्थसंकल्पावर आहे. पारदर्शकता, आरोग्य, पर्यावरण व शिक्षण या राज्य सरकारने सांगितलेल्या चतु:सूत्रीचे पालन अर्थसंकल्पात आहे. महसुली उत्पन्न ३३२९० कोटी रुपये तर महसुली खर्च २५३०२ कोटी इतका आहे. दोन वर्षे कोरोना महामारीमुळे मालमत्ता कर न वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आगामी पालिका निवडणुकीमुळे करवाढीबाबत चालढकल

शिवसेनेची टीका महापालिकेचा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी कुठल्याही फायद्याचा नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कंत्राटदार मित्रांसाठी बनवण्यात आला आहे, अशी टीका युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली.

अर्थसंकल्पावर दिसते शिंदे-फडणवीस यांची छाप निवडणुका डाेळ्यासमोर असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पालिका आयुक्तांनी या प्रकल्पांना मोठा निधी दिला. ठाकरे गटाचे ड्रीम प्रोजेक्ट राहिलेले कोस्टल रोड इतरांनाही निधी मिळाला.

१ मुंबईच्या सुशोभीकरणासाठी यंदा अर्थसंकल्पात १७२९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या आगामी निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा असणार आहे. २ समुद्रात सोडून देण्यात येणाऱ्या २ हजार दशलक्ष लिटर सांडपाण्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी करण्यात येणार आहे. या कामांसाठी अर्थसंकल्पात २७९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ३ मुंबईला खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी मुंबईतील जवळपास ४०० किमी लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवण्यात येणार आहेत. या कामांसाठी पालिकेला ६ हजार कोटींपेक्षाही जास्त खर्च अपेक्षित आहे. ४ प्रसिद्ध अशा गिरगाव चौपाटी ते कांदिवलीदरम्यान कोस्टल रोड होत आहे. कोस्टल रोडचे काम मार्गी लावण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे ३,५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...