आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्क वापरा:महाराष्ट्रात 5,218 नवे कोरोनाबाधित; 24 तासांत रुग्णसंख्येत 60 टक्के वाढ

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी होते 3260, राज्यात बरे होण्याचे प्रमाण 97.83 टक्के

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत २४ तासांमध्ये ६० टक्के एवढी मोठी वाढ नोंदली गेली. गुरुवारी महाराष्ट्रात ५ हजार २१८ नव्या रुग्णांची नोंद झाली. बुधवारी ३,२६० नवे रुग्ण आढळले होते.

सुदैवाने उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांचीही संख्या दिलासादायक म्हणजे ९७.८३ टक्के असून गुरुवारी ४,९८९ जण ठणठणीत झाले आहेत, तर एका मृत्यूची नोंद झाली. राज्यातील ५ हजारांपैकी मुंबईतील नव्या रुग्णांची संख्या २,४७९ आहे, तर औरंगाबाद मंडळात २४, लातूर मंडळात ३१ अशा मराठवाड्यात एकूण ५५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईखालोखाल पुणे मंडळात ६६५,नागपूर १३५,अकोला ६३,नाशिकमध्ये ६२ नव्या रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, गेले दोन दिवस आयसीएमआरचे पोर्टल बंद होते तसेच काही जुन्या रुग्णांचीही नोंद गुरुवारी करण्यात आल्याने रुग्णसंख्या जास्त दिसत असल्याचे महापालिकेच्या दैनंदिन अहवालात म्हटले आहे.

कोपनहेगन विद्यापीठ रुग्णालयातील प्रा. सेलिना किकेनबोर्ग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ११ हजार मुलांचा अभ्यास केला. लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या त्याच्या अहवालानुसार १४ वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये कोराेनाची २३ दीर्घकालीन लक्षणे आढळून आली. ती लक्षणे किमान दोन महिने दिसतात. थकवा आणि स्वभाव मूडी बनतो, असे दिसून आले आहे.

पहिल्या कोरोनातील किरकोळ आजार दुसऱ्या संसर्गात ठरू शकतो गंभीर

मेरिकेच्या जॉर्जियात पॉल स्मिथला फेब्रुवारी २०२० मध्ये कोरोना झाला, पण दवाखान्यात जाण्याची गरज पडली नाही. मार्च-२१ मध्ये पुन्हा संसर्ग झाल्यावर मात्र १३ दिवस रुग्णालयात राहावे लागले. डिसेंबर २०२१ मध्ये पॉलला तिसऱ्यांदा संसर्ग झाला. ७ दिवस आयसीयूत व नंतर १५ दिवस जनरल वॉर्डात राहावे लागले. वर आरोग्याशी संबंधित समस्या जडल्या. अमेरिकेत पॉलसारखे लाखो लोक आहेत ज्यांना दोनदा किंवा त्याहून अधिक वेळा संसर्ग झाला आहे. संसर्गजन्य रोगतज्ज्ञांनी अशा ५ लाख लोकांच्या आराेग्य समस्या व उपचारांची माहिती संकलितक करून त्याची छाननी केली आहे.

या आधारावर तयार करण्यात आलेल्या अहवालात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, एखाद्या व्यक्तीला जितक्या वेळा कोराेना संसर्ग होतो तितकी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता वाढते. कोरोनाच्या पहिल्या संसर्गावेळी एखादी छोटा आजार,व्याधी,दुखणे उद्भवले असेल तर दुसऱ्यांदा कोरोना झाल्यास त्या आजाराचे स्वरुप गंभीर होऊ शकते.कधी-कधी ते घातकही ठरु शकते,असे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. भारतात, सप्टेंबर २०२१ मध्ये संक्रमण दर सर्वाधिक होता. ९५ % लोकसंख्येला संसर्ग झाल्याचे आढळून आले. असे मानले जाते की सद्यस्थितीतही दररोज १२ हजार कोराेना बाधित रुग्ण आढळतात. त्यातील बहुतेकांना दुसऱ्यांदा संसर्ग झाला आहे. त्यामुळे सरकार वारंवार सावधगिरी बाळगण्याची सूचना देत आहे.

प्रत्येक वेळी संसर्गात वेगळ्या राेगांची लागण: अभ्यासाचे निष्कर्ष
प्रथम संक्रमण दुसऱ्यांदा संक्रमण तिसऱ्यांदा संक्रमण

नोट: प्रति 1000 रुग्णांचे सर्व्हेक्षण, याप्रमाणे वाढतो धोका
लॅन्सेट अहवाल : मुलांमध्ये २ महिने दिसतात लक्षणे