आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना कोरोना:राज्यातील 531 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, तर आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत 39 पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत

राज्यातील पोलिस विभाग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत. गेल्या  24 तासांत राज्यातील 70 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबतच राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा एकूण आकडा 531 झाला आहे. तर, आतापर्यंत 5 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात मुंबईत 3, पुण्यात 1 आणि सोलापुरात एकचा मृत्यू झाला आहे. 

सामान्य नागरिकांपासून आरोग्य कर्मचारी, पत्रकार आणि पोलिसांनाही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. आज 36 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काल 38 पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. राज्यात आतापर्यंत 531 पोलिसांना विषाणूची बाधा झाली आहे. यापपैकी 480 कॉन्स्टेबल आहेत, त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, इतर काही पोलिस अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. सुदैवाने आतापर्यंत 39 कोरोनाबाधित पोलिसांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.