आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • 56th Anniversary Of Shiv Sena | Today's Democracy Is To Keep MLAs In Hotels; I Am Not Worried About The Legislative Council Elections Thackeray

विधान परिषदेत शिवसेनेचे एकही मत फुटणार नाही:सेनेच्या वर्धापन दिनी CM ठाकरेंचा विश्वास; म्हणाले -राज्यसभेतही शिवसेना एकजूट होती

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणे हीच आजची लोकशाही असून, राज्यसभेत शिवसेनेचा एकही मत फुटले नव्हते आणि विधान परिषदेतही फुटणार नाही. मला आईचे दुध विकणारा नराधम माझ्या संघटनेत नको आहे आणि शिवसैनिक असे कधीच करणार नाहीत. त्यामुळे मला या निवडणुकीची चिंता नाही असे वक्तव्य शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आज शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन असून, त्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत बोलत होते.

पक्षासाठी अंगावर वार झेलणाऱ्यांना विनंम्र अभिवादन करतो. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाला जन्म दिला आहे. मला आजची पक्षस्थापनेचा तो दिवस आठवतो त्यावेळी मी सहा वर्षाचा होतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला.

हीच लोकशाही

पुढे ते म्हणाले की, मी शिवसैनिकांच्या संघर्षामुळेच शिवसेना उभी झाली. 56 वर्ष शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केले. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणे हीच आजची लोकशाही आहे. आज आपल्यासोबच 56 आमदार आहे. उद्याच्या विधान परिषद निवडणुकीची मला अजिबात चिंता नाही. शिवसेनेचा राज्यसभा निवडणुकीत एकही मत फुटलेले नाही. एकदा मागे मतांमध्ये फाटाफूट झाली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, "मला आईचा दुध विकणारा नराधम माझ्या संघटनेत नको" हे वाक्य खूप मोलाचे असून मला असा नराधम शिवसेनेत नको आहे.

दमडीचीही किंमत नाही

पुढे ते म्हणाले की, शिवसेनेचे आज आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्धव ठाकरे यांना दमडीची किंमत नाही मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्यावर समोरचा माणूस आदराने पाहतो. मी मुख्यमंत्री असलो काय आणि नसलो काय मला काहीच फरक पडत नाही, कारण माझे जे नाव आहे ते कुणीही काढू शकत नाही. ते मला कित्येक जन्माचा भाग्य आहे.

हिंदूत्वाचा नारा बुलंद

पुढे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भाष्य केले ते म्हणाले की, आज जे काही हिंदुत्वाचे डंके सुरू आहे. ज्यावेळी कोणी हिंदुत्वाचा उच्चार करायला तयार नव्हते. गर्व से कहो हम हिंदू है या घोषणा द्यायला कोणाही तयार नव्हते कारण हिंदू बोलणे हा त्याकाळी गुन्हा समजा जायचा तेव्हा हिंदूत्वाचा नारा बाळासाहेबांनी बुलंद केला.आज सुरू असलेले हिंदूत्व त्यांच्यासाठी असेल मात्र, ते माझ्यासाठी नाहीये, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

हृदयात राम आणि हातात काम

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात अनेक तरुण रस्त्यांवर उतरले आहेत. हृदयात राम आणि हातात काम हेच चित्र आज देशामध्ये दिसत आहे. हृदयात राम आहेच, पण हातामध्ये काम नसेल तर नुकते रामराम म्हणुन काहीच होणार नाही.

याला नाव अग्निवीर

शेतकरी कायदे जेव्हा आले तेव्हा शेतकऱ्यांनी धाडस करून पहिल्यांदा विरोध केला. त्यात अनेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणि केंद्र सरकारने पुन्हा एक नवीन टुमने काढले, केंद्र सरकार दरवर्षी नोकऱ्यांचे आश्वासन देत असते मात्र, देत काहीच नाही, अग्निपथ ही योजना गाडी चालवण्याची आहे आणि त्याला नाव अग्निपथ दिले. भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे. ही योजना म्हणजे मृगजळ आहे, असे असेल तर भाडोत्री राजकारण्यांसाठी देखील एक टेंडर काढा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अग्निपथ योजनेवरून केंद्रावर हल्लाबोल केला.

ही तर सत्तेची माज

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले यांनी भाजपवर टिकास्त्र सोडत म्हटले आहे की, उद्याच्या निवडणूक आमच्यामध्ये फूट दाखवणारी आहे. मात्र, आमच्याच फूट पडणार नाही, त्यामुळे मला त्याची चिंता नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, महाराष्ट्रातली शहाणी जनता आपल्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालू देत नाही. शेराला सव्वाशेर मिळतोच.

बातम्या आणखी आहेत...