आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परीक्षा:राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 6 वेळा संधी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नवीन नियम लागू करण्यात आले असून त्यानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६ तर उर्वरित मागास प्रवर्गातील ९ वे‌ळा संधी मिळणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किती वेळा परीक्षा देता येईल याबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. हा निर्णय २०२१ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या परीक्षांबाबतच्या जाहिरातींना लागू होईल.

काय आहेत नवे नियम
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान ६ संधी.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना संधींची मर्यादा नसेल.
- उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना किमान ९ संधी.
- उमेदवारांनी पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ती संधी मानली जाईल.
- एखादा उमेदवार पूर्वपरीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला उपस्थित राहिल्यास ती संधी मानली जाईल.
- उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेला गैरहजर राहिला तरी ती संधी मानली जाईल.

बातम्या आणखी आहेत...