आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंताजनक:महाराष्ट्रात रोज 6 हून अधिक महिलांवर बलात्कार, केवळ 13.7% टक्के प्रकरणांमध्ये शिक्षा

विनोद यादव। मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात 2021 मध्ये बलात्काराच्या एकूण 2,496 घटना घडल्या. या घटनांत तब्बल 2,506 महिला बलात्काराच्या बळी ठरल्या. अशाप्रकारे राज्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दररोज सरासरी 6 हून अधिक बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) ताज्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रातील महिलांवरील गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ 13.7 टक्के आहे.

दररोज अत्याचाराच्या 108 घटना

एनसीआरबीच्या अहवालानुसार, 2021 मध्ये महाराष्ट्रात महिलांविरोधात दररोज 108 गुन्हे घडले. या गुन्ह्यांची पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाली. राज्यात एकूण गुन्ह्यांत महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण 66 टक्के आहे. आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण 82 टक्के आहे. 2021 मध्ये विविध आयपीसी कलमांतर्गत महाराष्ट्रात महिलांविरुद्ध एकूण 39,526 गुन्हे नोंदवण्यात आले. 2018 मध्ये 35,497, 2019 मध्ये 37,144 आणि 2020 मध्ये 31,954 प्रकरणे नोंदवण्यात आली.

रोज एकाहून अधिक सामूहिक बलात्कार

महाराष्ट्रात 2021 मध्ये बलात्कारासह खुनाच्या 23 घटना घडल्या. यामध्ये बळींची संख्या 23 होती. म्हणजेच दर महिन्याला राज्यात बलात्कारासह खून किंवा सामूहिक बलात्काराच्या एकापेक्षा जास्त घटना घडल्या. महिलेची बदनामी या उद्देशाने तिच्यावर अत्याचार केल्याच्या 10,568 घटना 2021 मध्ये घडल्या. तर 89 महिला सायबर क्राईमच्या बळी ठरल्या आहेत.

गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यंत कमी

मुंबई, पुणे देशात मागे

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्याच्या बाबतीत आरोपी दोषी ठरवण्याचे प्रमाण कमी आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार 2021 मध्ये मुंबईतील महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये दोषी ठरण्याचे प्रमाण केवळ 26.2 % होते. तर, याच काळात दिल्लीचा दोषी ठरविण्याचा दर 38.4 टक्के, कोईम्बतूर 30.8 टक्के, इंदूर 41.3 टक्के, कानपूर 53.8 टक्के आणि कोलकातामध्ये हा दर 100 टक्के होता. त्याचप्रमाणे पुण्याचा दोषी ठरविण्याचा दर 19.6 टक्के आणि नागपूरचा केवळ 10.8 टक्के होता.

बातम्या आणखी आहेत...