आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांगेत उभ्या वृद्धाचा मृत्यू:नालासोपाऱ्यात लसीकरणाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 1 तास रांगेत उभे राहिले, बेशुद्ध होऊन कोसळल्याने वृद्धाचा मृत्यू

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरण केंद्रावर सुविधा नसल्याचा आरोप आहे

मुंबईला लागून असलेल्या नालासोपारा येथे लसीच्या नोंदणीसाठी आलेल्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 63 वर्षीय हरीश पांचाळ आरोग्य केंद्रात पोहोचले होते. यावेळी ते बेशुद्ध होऊन खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हरीशच्या कुटुंबीयांनी मनपाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

पहिले अस्वस्थ झाले, नंतर फरशीवर कोसळले
हरीश पांचाळ नालासोपारा (पश्चिम) येथील पाटणकर पार्कमध्ये राहत होते. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ते लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी आरोग्य केंद्रात पोहोचले. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की हरीश केंद्राबाहेर सुमारे 1 तास रांगेत उभे राहिला. दरम्यान, ते अस्वस्थ झाले. काही वेळाने ते फरशीवर पडले. तो जमिनीवर पडताच त्यांच्या डोके खोलीतील दगडावर आदळले आणि रक्तस्राव होऊ लागला. त्यानंतर त्यांना नालासोपारा (पूर्वेकडील) तुलिंज येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मधुमेहाचा होता त्रास
वसई विरार महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके म्हणाल्या की वृद्धांना मधुमेहाचा त्रास होता. त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वृद्धाच्या निधनानंतर त्यांची कोरोना टेस्टही घेण्यात आली आहे. दरम्यान अद्यापत रिपोर्ट आलेला नाही.

लसीकरण केंद्रावर सुविधा नसल्याचा आरोप आहे
हरीश यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मित्र आणि त्यांच्यासमवेत असलेले ताराचंद मेहता म्हणाले की, बाबुसिंह राज पुरोहित या सामाजिक कार्यकर्त्याने आरोग्य केंद्रात योग्य सुविधा नसल्याबद्दल 10 मार्च रोजी पालिकेत अर्ज दाखल केला होता. बाहेर शेड न केल्यामुळे वृद्धांना जास्त काळ उन्हात उभे राहावे लागते. येथे बसण्यासाठी योग्य व्यवस्था नाही. बराच वेळ उभे राहून हरीश यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले.

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची लाट
देशातील सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना पुन्हा वाढला आहे. गेल्या 24 तासांत 15,817 नवीन प्रकरणे आणि 56 मृत्यू झाले आहेत. सलग 3 दिवस येथे 13 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...