आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी राज्यात ६३.८९ टक्के मतदान झाले. मराठवाडा, पुणे आणि नागपूर पदवीधर आणि पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघ तर धुळे येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची पोटनिवडणूक होती. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी अंदाजे ६९.०८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
मराठवाडा : टक्का दुपटीने वाढला
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत यंदा रेकॉर्डब्रेक म्हणजेच ६४.४९ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. मागील निवडणुकीत ३७ टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे धुळे येथे सर्वाधिक ९९.३१ टक्के मतदान झाले. या वेळी २४ टक्के अधिक मतदान झाले. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ६७.४४ टक्के मतदान झाले. त्यानंतर उस्मानाबादमध्ये ६६.९७%, नांदेडमध्ये ६४.०७%, बीडमध्ये ६२.०८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हिंगोलीत ६५.५८ टक्के मतदान झाले. औरंगाबाद जिल्ह्यात ६३.०५%, जालना जिल्ह्यात ६६.५४%, लातूरमध्ये ६६.११% मतदान झाले. गेल्या वेळेच्या तुलनेत बहुतांश जिल्ह्यांत दुपटीने मतदान झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
हिंगोलीत रुग्णाचे पीपीई किट घालून मतदान
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व कुरुंदा (ता.वसमत) येथील मतदान केंद्रावर कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी पीपीई किट घालून मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्थाही करण्यात आली होती. सेनगाव येथील कोविड रुग्णालयात दोन तर वसमत येथील कोविड रुग्णालयात एक मतदार उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
पदवीधर मतदारसंघ
- औरंगाबाद ६४.४९
- पुणे ५०.३०
- नागपूर ५४.७६
शिक्षक मतदारसंघ
- अमरावती ८२.९१
- पुणे ७०.४४
- धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे ९९.३१% मतदान झाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.