आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणमंत्री यांची माहिती:शिक्षकांची 65 हजारांवर पदे रिक्त, 30 हजार पदे भरणार

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांची ६५ हजार १११ पदे रिक्त असून पैकी ३० हजार पदे भरण्याचा सरकारचा मानस आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी (ता.२) विधानसभेत दिली. आमदार वैभव नाईक यांनी याप्रश्नी तारांकीत प्रश्न विचारला होता. त्याला लेखी उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले की, शासकीय आश्रमशाळेतील १५४६, अनुदानित आश्रमशाळेतील ७२२ पदे रिक्त आहेत. बोगस विद्यार्थी पटसंख्या २०१२ मध्ये आढळून आली होती. त्यामुळे २०२० पर्यंत शिक्षकांची पदभरती बंद ठेवली होती.

कुस्तीपूर्वी डोपिंगची चाचणी नाही: उत्तेजनासाठी मेफेन्टरमाईन या औषधांचे इंजेक्शन सोलापुर जिल्ह्यातील पैलनान घेत असल्याचे आढळून आले आहे. मात्र कुस्तीपूर्वी पैलनावांची डोपींग टेस्ट करण्याची मागणी आमच्या विभागाकडे कोणत्याही संघटनेने केलेली नाही, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी (ता.२) विधानसभेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अंमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी यासंदर्भात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना मंत्री राठोड म्हणाले की, सोलापुर जिल्ह्यातील ७ मेडीकलच्या तपासण्या करण्यात आल्या. पैकी ३ मेडीकल स्टोअर्समधून सदर औषध हे डाॅक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय विनाबिल विकण्यात आल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी अकलूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अल्पसंख्याक शाळांत १७४७ पदे भरणार २०१७ मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीमध्ये मुलाखतीशिवाय ५९७० आणि मुलाखतीसह १९३३ शिक्षकांची पदे भरण्यात आली आहेत. अल्पसंख्याक शाळेतील १७४७ शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता दिली आहे. २०२२ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीनुसार शिक्षकांची ३० हजार पदे भरण्यात येत आहेत, असे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...