आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात 67123 नवे बाधित, 419 मृत्यू, मराठवाड्यात 8,420 रुग्ण; नांदेड जिल्ह्यात 28 मृत्यू

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात शनिवारी ६७,१२३ नवे रुग्ण आढळले असून ४१९ मृत्यंूची नोंद झाली. गेल्या २४ तासांमध्ये ५६,७८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ३७,७०,७०७ झाली असून ३०,६१,१७४ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ८१.१८ झाले आहे.

औरंगाबाद - मराठवाड्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी ८,४२० नवे रुग्ण आढळले, तर १४२ मृत्यूंची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण १६४३ रुग्ण लातूर त्याखालोखाल औरंगाबाद १६०० आढळले. सर्वाधिक ३९ मृ्त्यूंची नोंद औरंगाबाद जिल्ह्यात झाली. जालना जिल्ह्यात ८६९ रुग्ण, तर ७ मृत्यू. बीड १२११ नवे रुग्ण, ३ मृत्यू, हिंगोली २०६ रुग्ण, ४ मृत्यू,लातूर जिल्ह्यात १६४३ नवे रुग्ण आढळले तर २५ मृत्यूंची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात १४५० अहवाल पॉझिटिव्ह आले, तर २८ जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात ६५३,२० मृत्यू झाले. परभणी जिल्ह्यात ७८८ रुग्ण आणि १६ मृत्यूची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...